व्हायरल
नवी दिल्ली, 25 मार्च : आजकाल सोशल मीडिया वापरण्याचं प्रमाण वाढलं आहे. लोक त्यांचा बराचसा वेळ सोशल मीडियावरच घालवताना दिसतात. फोटो, व्हिडीओ टाकत अनेकजण प्रसिद्धी झोतात येत असतात. माणसंच नाहीतर प्राण्यांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालताना दिसतात. आजकालचे प्राणीही खूप हुशार झाले आहेत. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका कुत्र्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये चक्क कुत्र्यानेच स्वतःचा व्हिडीओ शूट केल्याचं पहायला मिळतंय. या व्हिडिओमध्ये एक कुत्रा टिकटॉक व्हिडिओ बनवताना दिसत आहे, तोही कोणाच्याही मदतीशिवाय. तो स्वतः कॅमेरा ऑन करतो आणि नाचू लागतो. ट्रायपॉडवर लावलेला मोबाईल कॅमेरा कसा कुत्रा ऑन करतो आणि मग चार पावले मागे सरकतो आणि वेगवेगळ्या कृती दाखवू लागतो. कधी तो गोल गोल फिरतो तर कधी तो दोन पाय वर करत नखरे दाखवतो. इतकेच नाही तर शेवटी तो पूर्णपणे मॉडेल्स मोडमध्ये जातो आणि हटके चाल दाखवू लागतो. एवढ्या मस्त पद्धतीने कुत्रा व्हिडिओ बनवताना तुम्ही क्वचितच पाहिले असेल.
कुत्र्याचा हा खास व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. काही वेळात हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला. व्हिडीओवर भरपूर कमेंटदेखील पहायला मिळत आहेत. अनेकांनी त्याला टिकटॉकर कुत्रा म्हटलं आहे.
दरम्यान, अवघ्या 18 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 6 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. यापूर्वीही कुत्र्यांचे हटके व्हिडीओ समोर आले आहेत. नेटकरी अशा व्हिडीओंना अधिक पाहतात.