नवी दिल्ली 08 मे : सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात वन्य प्राण्यांच्या व्हिडिओलाही (Wild Animals Videos) नेटकऱ्यांची विशेष पसंती मिळते. प्राण्यांच्या शिकारीचे आणि मस्तीचे व्हिडिओ अनेकदा आपल्याला पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ इतके भयानक असतात की ते पाहूनच थरकाप उडत. सध्या असाच एका बिबट्याचा आणि रानडुकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. छातीवर चढून श्वानाने मालकाला नदीच्या पाण्यात ढकललं; कॅमेऱ्यात कैद झाली घटना, पाहा VIDEO बिबट्याची गणना जगातील सर्वात भयंकर प्राण्यांमध्ये होते. शिकारीच्या आपल्या वेगळ्या अंदाजामुळे त्यांना ओळखलं जातं. अनेकदा बिबट्या शिकार करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. मात्र वाईट वेळ आल्यावर अगदी खतरनाक शिकारीही दुसऱ्या कोणाचीतरी शिकार बनल्याचं पाहायला मिळतं. याचाच प्रत्यय देणारा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही रानडुक्कर रस्त्याच्या मधोमध एका बिबट्याची शिकार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ शेअर झाला होता. मात्र, सध्या पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन रानडुक्कर रस्त्याच्या मधोमध बिबट्याची शिकार करताना दिसत आहेत. ही अनोखी आणि खतरनाक शिकार पाहून रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तीनेही आपली कार थांबवली. यादरम्यान कोणीतरी व्हिडिओ शूट केला जो नंतर व्हायरल झाला. पोपट शोधून द्या आणि इतके हजार जिंका; पक्षाच्या आठवणीने व्याकूळ मालकाने शहरभर लावले पोस्टर्स हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या अनेक पेजवर शेअर केला जात आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. या व्हिडिओवर कमेंट करून अनेकजण निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. बिबट्यासारख्या शिकारी प्राण्याची शिकार होताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.