व्हायरल व्हिडीओ
मुंबई 27 डिसेंबर : वाघ, सिंह किंवा मग बिबट्या जंगलातील हिंस्र प्राण्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी देखील लोकांना घाम फुटतो. कारण त्यांच्या तावडीत कोणी नुसतं अडकली तरी त्याचा खेळ खल्लास झाला म्हणून समजा. कारण ते सहसा कोणत्याही प्राण्याला सहजासहजी सोडत नाही. यातूनच एखादा प्राणी वाचला, तर समजावं की तो खूपच लक्की आहे. सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तसा जुना आहे. पण या व्हिडीओमध्ये जे काही घडतं त्यावर विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. हे ही पाहा : Video : अजगराजवळ जाण्याची चुक करुन बसली, पुढच्या क्षणी जे घडलं ते पाहून येईल पोटात गोळा जंगलात राहणारे बिबट्या कधी कधी गाव किंवा शहरासारख्या ठिकाणी घुसतात. यानंतर ते एकतर पकडले जातात किंवा ते कोणत्याही प्राणी, लहान मुलं किंवा लोकांवर हल्ला करतात. अलीकडेच एका गावाच्या बाजूला बांधलेल्या रस्त्यावर बिबट्या पोहोचला आणि तिथे एक गाय या बिबट्याला आयती भेटली होती. पण पुढे जे घडलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. वास्तविक हा व्हिडीओ एका यूजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रात्रीची वेळ होती, सर्वत्र अंधार झाला होता. तेव्हा रस्त्याच्या कडेला एक गाय चरत बसली होती. तेव्हा तिच्यामागे एक बिबट्या दबा धरुन बसला होता. पण जेव्हा त्याच्यावर गाडीची लाईट पडली आणि तो स्तब्ध झाला.
काही काळासाठी तर तो पुतळा असल्याचं भासत होता. त्यानंतर तो बिबट्या थोडा हल्ला आणि मग पुढे गायीवळ गेला. पण तिथे जाऊन त्याने गायीवर हल्ला केलाच नाही. तो तिथून थेट निघाला आणि रस्त्यात्याच्याकडेवरुन चालू लागला. जेव्हा बिबट्या जवळ आला, तेव्हा गायीच्या थोडं लक्षात आलं होतं, पण पुढे बिबट्या काही न करता निघून गेला आणि गायीनं देखील आपला चारा खाणं सुरु ठेवलं.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना देखील प्रश्व पडला आहे की बिबट्याने असं का केलं? त्याला कसली भीती वाटत होती, हे काही कळू शकलेलं नाही. काहींच असं म्हणणं आहे की बिबट्याला गाय तिथे असल्याचं जाणवलंच नाही.