जगातील अशी बिल्डिंग जी वारा येताच डोलू लागते

अमेरिकेतील मॅनहॅटनमध्ये असलेला हा उंच टॉवर जगभरात प्रसिद्ध आहे, चला याबद्दलचे काही Facts पाहू

डेव्हलपर्सचा दावा आहे की ही 'जगातील सर्वात बारीक इमारत' आहे

स्टॅनवे टॉवर असे या बिल्डिंगचे नाव आहे. याची उंची 1,428 फूट आहे. या टॉवरमध्ये 84 मजले आहेत

ही बिल्डिंग सुरुवातीला स्टॅनवे हॉल म्हणून डिझाइन केली, नंतर या ठिकाणी 15 हजार कोटी खर्चून निवासी टॉवर बांधण्यात आला

इंजीनिअरचा असा दावा आहे की वाऱ्यामुळे बिल्डिंग हलते, पण आत राहणाऱ्यांना ते जाणवू शकणार नाही

या टॉवरमध्ये एकूण 60 अपार्टमेंट आहेत. या मधील एका अपार्टमेंटची किंमत सुमारे 58 कोटी ते 330 कोटी रुपये आहे

हा टॉवर जगभरात चर्चेचा विषय बनलाय, तो त्याच्या सौंदर्यामुळे नव्हे, तर त्यावरून पडणाऱ्या बर्फामुळे

हा टॉवर विज्ञानाचा चमत्कार मानता येईल. 1428 फूट उंच स्टॅनवे टॉवरच्या वरच्या मजल्यावर, हिवाळ्याच्या मोसमात बर्फ साचतो

अशा इमारतींमध्ये राहणार्‍या लोकांना संपूर्ण शहराचे उत्तम दृश्य मिळत असले, तरी ते धोकादायकही ठरू शकतात