बायको-गर्लफ्रेंडच्या भांडणात नवऱ्याने मारला चान्स.
लखनऊ, 24 ऑक्टोबर : पती-पत्नी और वो… अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशी प्रेम प्रकरणं उघड झाल्यावर काय होतं हेसुद्धा तुम्ही पाहिलं असेल. सामान्यपणे बायकोने नवऱ्याला असं रंगेहाथ पकडलं तर नवरा आणि त्याची गर्लफ्रेंड दोघांचीही धुलाई होणं हे निश्चित पण सध्या सोशल मीडियावर अशा प्रेम प्रकरणाचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. जो पाहून तुम्हीहीसुद्धा हैराण व्हाल.
आतार बायको आणि गर्लफ्रेंड एकमेकांसमोर आली तर काय होईल? असं तुम्ही विचारलं तर त्या दोघांमध्ये भांडणं होतील, मारामारी होईल इतकंच नव्हे तर सोबत दोन-दोन बायका ठेवणाऱ्या त्या पुरुषाची धुलाई होईल… बरोबर ना… पण या व्हिडीओ जे घडलं त्याचा तुम्ही विचारही केला नसेल.
हे वाचा - नवरा घरकाम करत नाही म्हणून तक्रार पडली महागात; बायकोच पोहोचली तुरुंगात
व्हिडीओत पाहू शकता दोन महिला भररस्त्यात भांडताना दिसत आहे. एकमेकींसोबत मारामारी करत आहेत. त्यांच्या आजूबाजूला एक पुरुष फिरताना दिसतो आहे. या पुरुष या दोन महिलांपैकी एकीचा नवरा आणि एकीच बॉयफ्रेंड आहे. या दोघीही त्या एका पुरुषासाठी भांडत आहेत. जेव्हा त्यांचा त्या प्रेम करत असलेल्या एकाच पुरुषासमोर आमनासामना झाला तेव्हा त्यांनी एकमेकींना मारायला सुरुवात केली. तसं हे होणं साहजिकच आहे. पण यानंतर जे घडलं ते मात्र धक्कादायकच म्हणावं लागेल.
आता बायको-गर्लफ्रेंड एकाच वेळी समोरासमोर आली तर काय होईल तुम्हीच सांगा. तो पुरुष तिथं उभाही राहणार नाही. संधी मिळाली तो तिथून गुपचूप पळ काढेल. पण हा पुरुष मात्र तिथंच थांबला. फक्त थांबलाच नव्हे तर दोघींच्या भांडणात त्याने आपला डावही साधून घेतला.
हे वाचा - सोसायटीमधील सुरक्षारक्षक आणि रहिवाशांची तुंबळ हाणामारी; अनेक महिला जखमी, Shocking Video
जेव्हा या दोघी एकमेकींवर तुटून पडल्या तेव्हा त्याने आपल्या पायातील चप्पल काढून त्यांना मारायला सुरुवात केली. त्या महिलांचं तसं त्यावेळी त्याच्याकडे फार लक्ष असलेलं दिसत नाही. त्या आपसातच भांडताना दिसत आहेत. त्यामुळे त्या दोघींना सोडवण्याच्या बहाण्यातून नवरा चपलेने मारतो आहे.
@mews_in ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टनुसार उत्तर प्रदेशातील फारुखाबाद जिल्ह्यातील राम मनोहर लोहिया जिल्हा रुग्णालयातातील ही घटना आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.