JOIN US
मराठी बातम्या / Viral / लग्नात वधू-वर एकमेकांना फुलांचे हार का घालतात? अनेकांना माहिती नाही यामागचं खरं कारण

लग्नात वधू-वर एकमेकांना फुलांचे हार का घालतात? अनेकांना माहिती नाही यामागचं खरं कारण

हिंदू विवाहात फुलांचे हार वधुवरांनी एकमेकांना घालण्याचा विधी आहे, तो रामायण आणि महाभारत काळापासून चालत आला आहे.

जाहिरात

वधू-वर एकमेकांना फुलांचे हार का घालतात?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 01 जुलै : हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन धर्मांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात प्राचीन काळापासून चालत आलेल्या अनेक परंपरा आणि विधी आजही पाळले जातात. बदलत्या काळानुसार काही प्रथा बंद झाल्या व काही बदलल्या आहेत. हिंदू धर्मात होणारे विवाह फक्त वधू-वरांचं नाही तर दोन कुटुंबाचं मीलन असतं. हिंदू विवाहात फुलांचे हार वधुवरांनी एकमेकांना घालण्याचा विधी आहे, तो रामायण आणि महाभारत काळापासून चालत आला आहे. या संदर्भात ‘नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलंय. हारांना जयमाला असंही म्हणतात, त्याचा उल्लेख वेदांमध्येही आहे. विवाह समारंभात पाळली जाणारी ही सर्वांत जुन्या परंपरेपैकी एक आहे, जी भारतातील अनेक भागांमध्ये थोड्याफार फरकाने पाळली जाते. दक्षिण भारतात हा हार मोठा व जाड असतो, तर उत्तर भागात तो लहान व हलका असतो. वऱ्हाडात लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यावर वधूच्या आईने ओवाळल्यानंतर हा विधी होतो. पण हा विधी नेमका कशासाठी होतो, त्याचे महत्त्व काय, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. लग्नाच्या दिवशी नवरदेवाने मंडप सोडून थेट पोलीस ठाणं गाठलं; नवरीविरोधातच केली तक्रार, प्रकरण काय? काळानुसार बदलला विधी एकेकाळी वधू लाजत वराला हार घालायची आणि बाकीचे लोक शांतपणे उभे राहून पाहत असत. पण आता या विधीवेळी खूप मस्ती केली जाते. या विधीदरम्यान मुलीकडचे व मुलाकडचे अशा दोन टीम बनतात आणि मजामस्ती करतात. कधीकधी वराला त्याचे मित्र खांद्यावर उचलून घेतात, तर काही वेळा वधू-वर एकमेकांसोबत मस्ती करतानाही दिसतात. का केला जातो विधी? फुलांचे हार घालण्याच्या विधीचा इतिहास भगवान शंकर-पार्वती आणि श्रीराम-सीता यांच्या विवाहापासूनचा आहे असं मानलं जातं. हा विधी पूर्ण करून, वधू आणि वर सात जन्मांसाठी लग्नबंधनात अडकण्यासाठी पहिलं पाऊल टाकतात. दोघंही एकमेकांना पुष्पहार घालतात, याचा अर्थ दोघंही एकमेकांना आयुष्यभर पती-पत्नी म्हणून स्वीकारतात. वर वधूला माला आधी का घालत नाही? ही परंपरा सुरू झाली, तेव्हा पुरुषांना स्त्रीशी लग्न करण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागायचं, त्यामुळे मुलींचे स्वयंवर व्हायचं. ज्यामध्ये मुलगी तिच्या आवडीच्या पुरुषाला वरमला घालून लग्नासाठी निवडायची. म्हणूनच आताही वधू वराच्या गळ्यात आधी वरमाला घालतात. कोणत्या फुलांपासून बनवतात वरमाला? प्रथेप्रमाणे विविधरंगी फुलांचा समावेश वरमालेत केला जातो. पांढरा, लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी इत्यादी रंगाची फुलं यात जास्त दिसतात. हार तयार करण्यासाठी गुलाब, कार्नेशन, ऑर्किड, झेंडू या फुलांचा वापर केला जातो. कारण ही फुलं सौंदर्य, आनंद, उत्साह यांचं प्रतीक मानली जातात. एकत्र बांधलेली सर्व फुलं वैवाहिक बंधनामुळे दोन व्यक्तींची मीलन दर्शवतात. हल्ली वरमालेत रुपये किंवा डॉलरही वापरतात, ते कपलसाठी गुड लक चार्म मानले जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या