व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : आजकाल तरुण तरुणी कधीही कुठेही कोणाला प्रपोज करत आहेत. जे कोणी आवडेल त्याला हिंमत करुन सांगत आहेत. प्रेम कोणत्याही लिंग, वय, जात, वंश आणि धर्माच्या सीमा ओळखत नाही. तो कोणत्याही माणसाच्या प्रेमात पडतो, कोणत्याही व्यक्तीवर प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा नसला तरी असे करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महाविद्यालयीन मुलाने परिणामाचा विचार न करता एका महिलेला प्रपोज केले आहे. त्यामुळे रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला. सध्या व्हायरल होत असलेला तरुणाचा व्हिडीओ @gharkekaleshh या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यात गोंधळ होत असलेला पहायला मिळत आहे. यामध्ये महिला म्हणत आहे की, याने मला काय म्हटले सांगायलाही लाज वाटत आहे. त्याचं वय काय आणि माझं वय काय. माझं मुलगाच याच्याएवढा असेल. महिला ओरडत ओरडत मुलाला विचारते, तुला लाज वाटत नाही का? अचानक एक व्यक्ती येऊन तरुणाच्या कानाखाली मारतो. त्यानंतर वातावरण अधिकच तापतं.
पुढे महिलाच चप्पल काढून त्या मुलाला मारहाण करते. भर रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामा पाहून अनेक गर्दी जमा झाली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियार व्हायरल होत असून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही वेळातच हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
दरम्यान, भर रस्त्यावर हायव्होल्टेज ड्रामाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एकीकडे या महिलेचे त्या मुलाला वय काय म्हणत मारहाण केली असून दुसरीकडे अनेक लोक वयाचे बंधनं तोडून संसार थाटत आहेत. त्यामुळे आपण कुठे आणि कोणाला, कधी प्रपोज करतोय याचा विचार करावा आणि पुढे काय होईल याच्या परिणामांचाही.