JOIN US
मराठी बातम्या / Viral / Shocking! तरुणी अशा नाचल्या की 'धरतीही फाटली', त्यातच सामावल्या सर्व जणी; Watch Video

Shocking! तरुणी अशा नाचल्या की 'धरतीही फाटली', त्यातच सामावल्या सर्व जणी; Watch Video

नाचता नाचता तरुणींसोबत जे घडलं ज्याचा कुणीच विचार केला नसेल.

जाहिरात

नाचताना तरुणींसोबत भयंकर दुर्घटना.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 सप्टेंबर : डान्सचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच काही तरुणींच्या डान्स व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारण म्हणजे डान्सची स्टाइल नव्हे तर डान्स करता जे घडलं ते धक्कादायक आहे. तरुणींनी असा डान्स केला असा डान्स केला की धरतीच फाटली. नाचता नाचता या तरुणी जमिनीत सामावल्या गेल्या. हा शॉकिंग व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. डान्स करताना स्टेजवरून कुणी खाली कोसळलं किंवा स्टेज तुटला अशा घटना तुम्हाला माहिती असतील पण इथं मात्र जमिनीच फाटली आहे. अचानक मोठा खड्डा तयार झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल. व्हिडीओत पाहू शकता काही तरुणींनी एकमेकांच्या गळ्यात हात टाकले आहेत. सर्वजणी गोलाकार उभ्या आहेत आणि त्या उड्या मारत नाचताना दिसत आहे. या तरुणी एकमेकींना भेटून आनंदी झाल्या आहेत आणि नाचून त्या आपल्या आनंद व्यक्त करत आहेत. पण आपल्यासोबत पुढे काही भयंकर घडणार आहे, याचा विचारही त्यांनी केला नसेल. हे वाचा -  VIDEO - World Record साठी धगधगत्या ज्वालामुखीवरून चालले तरुण; तोल गेला अन् असा शेवट झाला की… नाचता नाचता अचानक त्यांच्या पायाखालची जमीनच धसते आणि मोठा खड्डा तयार होतो. त्या सर्वजणी एकाच वेळी एकत्र त्या खड्ड्यात पडतात. व्हिडीओ पाहूनच आपल्याला धडकी भरते. तिथं उपस्थित असलेले लोकही हे दृश्य पाहन घाबरले. कुणीतरी हे सर्वकाही आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे वाचा -  लागली पैज? असा गरबा तुम्ही कधीच पाहिला नसेल, आगळ्या-वेगळ्या Video ने वेधलं सगळ्यांचं लक्ष ही घटना कुठची आणि कधीची आहे माहिती नाही. सोशल मीडिया रेडिटवर हंबल टेलर नावाच्या अकाऊंटवर हा पोस्ट कऱण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या