याचा अर्थ काय?
मुंबई, 03 मार्च : ऑप्टिकल इल्युजनची कोडी चित्रं किंवा आकारांच्या माध्यमातून तयार करण्यात येतात. काही कोडी मात्र शब्द आणि संख्यांच्या माध्यमातून तयार केलेली असतात. ती सोडवण्यासाठी खूप जास्त बुद्धिमत्ता लागते. गणिती कोडी किंवा शाब्दिक कोडी सोडवणं सहज शक्य होत नाही. वास्तविक त्यांचं उत्तर सोपंच असतं; पण ते सहज सापडत नाही. त्यासाठी काही ट्रिक वापराव्या लागतात. असंच एक कोडं सध्या व्हायरल होतंय. यात गाडीच्या मागे लिहिलेली एक ओळ दिसतेय. हिंदी, इंग्रजी अक्षरं आणि आकडे यांच्या माध्यमातून एक संदेश त्या ओळीत लिहिण्यात आलाय; मात्र तो वाचणं खूप अवघड आहे. ‘झी न्यूज’ने त्याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. गाड्यांच्या आणि खासकरून ट्रकच्या मागे लिहिलेले संदेश वाचणं हे प्रवासातलं मनोरंजक काम असतं. ते वाचताना काही नवीन नावं सापडतात, कवितेच्या किंवा शायरीमधील काही चांगल्या ओळी दिसतात किंवा काही मजेशीर ओळीही सापडतात. हिंदी, इंग्रजी किंवा स्थानिक भाषांमध्ये ते संदेश लिहिलेले असतात. अशाच एका ओळीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा मेसेज वाचणं खूप अवघड आहे. VIDEO - मांजरीसारखा दिसणारा दुर्मिळ प्राणी, अनेकांना माहिती नाही; तुम्ही सांगू शकता का हा कोण? व्हायरल झालेल्या या संदेशामध्ये काही हिंदी तर काही इंग्रजी अक्षरं आहेत. त्याशिवाय काही आकडेही आहेत. त्यामुळे तो संदेश नेमका कसा वाचायचा ते पटकन समजत नाही. हा संदेश वाचण्यासाठी 10 सेकंदांचा वेळ देण्यात आलाय. तुम्हालाही हा संदेश वाचायला जमत नसेल, तर प्रत्येक हिंदी व इंग्रजी अक्षराचा अर्थ लावा. उत्तर शोधण्यासाठी एक ट्रिक करता येऊ शकेल. ती संपूर्ण ओळ हिंदीतूनच वाचण्याचा प्रयत्न करा. त्यातल्या आकड्यांचाही उच्चार हिंदीतूनच करा. यातून तुम्हाला ती ओळ वाचता येऊ शकेल. मोठ्याने वाचल्यामुळेही ती ओळ वाचणं सोपं होऊ शकेल. ट्रकवर लिहिलेल्या या ओळीतून विद्यार्थ्यांना चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी कोड्याच्या माध्यमातून ती ओळ लिहिली आहे. यामुळे वाचणाऱ्याला आणखी रंजक वाटतं.
अशी कोडी सोडवणं खूप मनोरंजक असतं. गाड्यांच्या मागे लिहिलेल्या पाट्यांवर कधीकधी अशी रंजक कोडी लिहिलेली असतात. सोशल मीडियावर ती खूप लोकप्रिय होतात. अशी कोडी बुद्धिमत्तेचा कस पाहणारी असतात. तसंच तर्कबुद्धीलाही चालना देतात. त्यामुळे वाचकांना अशी कोडी सोडवायला आवडतात. ऑप्टिकल इल्युजनच्या कोड्यांप्रमाणेच ती खूप व्हायरलही होतात; मात्र अशी कोडी तयार करणं हेही अवघड काम असतं. म्हणूनच ती सोडवणं मेंदूला चालना देतं. चक्क किडनीचा Sale! जाहिरात होतेय VIRAL; काय आहे यामागील सत्य? या कोड्याचं उत्तर तुम्हाला सापडलं असेलच; पण सापडलं नसेल तर त्याचं उत्तर आहे - पढाई जीवन का आधार है!