प्रतीकात्मक फोटो - Canva
काठमांडू, 09 जून : प्रत्येक ठिकाणी खाद्यपदार्थांप्रमाणे खाण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असतात. कुणी जमिनीवर बसून जेवतं, तर कुणी डायनिंग टेबलवर, कुठे हातांनी जेवतात तर कुठे काटे-चमचा, चॉपस्टिकने. पण तुम्हाला अशी पद्धत माहिती आहे का? ज्यात महिला लाथ मारूनच पुरुषांना जेवणं देतात. तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल. पण ही अजब प्रथा प्रत्यक्षात आहे. सामान्यपणे खाद्यपदार्थ आणि खाण्याच्या पद्धती वेगळ्या असल्या तरी ते सर्व्ह करणं म्हणजे वाढण्याचं काम हातांनीच होतं. पण एक असं ठिकाण आणि एक समाज जिथं जेवण हातांनी नव्हे तर पायांनी दिलं जातं. म्हणजे लाथ मारून जेवणाचं ताट दिलं जातं. थारू जमातीची ही प्रथा आहे. जे एकेकाळी भारतात राहत होते आता नेपाळच्या दक्षिण भागात राहतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या जमातीमध्ये असं काही घडलं ज्यामुळे त्यांच्यात पितृसत्ताक परंपरा नाही मातृसत्ताक परंपरा पाळली जाते. म्हणजे या समाजातील कुटुंबप्रमुख ही महिला असते. Weird Tradition - सासरी जाणाऱ्या लेकीच्या छातीवर थुंकतो बाप; इथं लग्नानंतर विचित्र पद्धतीने होते मुलीची पाठवणी या जमातीबद्दल असं म्हटलं जातं की 1576 मध्ये हल्दीघाटी युद्धावेळी महाराणा प्रताप यांच्या सैन्यातील उच्चभ्रू सैनिकांनी आपल्या कुटुंबाला सुरक्षिततेसाठी काही सैनिकांसह हिमालयाच्या पायथ्याशी पाठवलं होतं. हे लोक तराई क्षेत्रात पोहोचले आणि तिथंच वास्तव्य केलं. त्यानंतर त्यांना थारू म्हटलं जाऊ लागलं. मात्र इथं पोहोचल्यानंतर या महिलांना असुरक्षित वाटू लागलं. त्यामुळे आपली इज्जत वाचवण्यासाठी त्यांनी आपल्यापेक्षा खालच्या पदावर असलेल्या सैनिकांशी लग्न केलं. पण या सर्व महिला या लग्नामुळे अजिबात खूश नव्हत्या. परिणामी, त्यांनी त्यांच्या पतींना योग्य तो आदर दिला नाही. त्यांना उच्चवर्णीय आणि राजघराण्यातील असल्याचा गर्व होता. या गर्वात त्यांनी स्वत:ला कुटुंबप्रमुख मानलं आणि पतींना लाथ मारूनच अन्न द्यायला सुरुवात केली. Weird Tradition : इथं लग्नाआधी गाढविणीसोबत ठेवावे लागतात संबंध; कारणही धक्कादायक नवऱ्याला बायको अशा पद्धतीने जेवण देणं बायकोला अभिमानास्पद वाटायचं. काळ बदलत राहिला पण या जमातीची ही परंपरा लोकांमध्ये आजही कायम आहे.