JOIN US
मराठी बातम्या / Viral / OMG! सापालाही फुटली शिंगं; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

OMG! सापालाही फुटली शिंगं; विश्वास बसत नाही तर पाहा हा VIDEO

शिंगवाल्या सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

जाहिरात

शिंगवाल्या सापाचा व्हिडीओ.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 15 सप्टेंबर : साप म्हटलं की त्याला फक्त डोळे आणि जीभ असल्याचं आपल्याला माहिती आहे. ना त्याला कान असतं, ना नाक. पण सध्या असा एक साप समोर आला आहे, ज्याला चक्क शिंगं फुटली आहेत. शिंगावाल्या सापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. शिंग असलेल्या या विचित्र सापाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिंग असलेले प्राणी कोणते असं विचारलं तर कुणी बैल, म्हैस, रेडा अशा प्राण्यांची नावं सांगेल. पण तुम्हाला कुणी सांगितलं की सापालाही शिंगं असतात, तर साहजिकच कुणाचा विश्वास बसणार नाही. सापाला शिंग? छे… शक्यच नाही. असं तुम्ही म्हणाल. पण व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. किंबहुना तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. हे वाचा -  साप आणि मुंगूस आपापसात भिडले, ‘या’ भांडणाचा शेवट मात्र धक्कादायक, पाहा VIDEO @Dushyant_Kumar3 ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स थक्क झाले आहेत. व्हिडीओत पाहू शकता जमिनीवर एक साप वेगाने पळताना दिसतो आहे. नीट पाहिलं तर सापाचं तोंड थोडं विचित्र दिसतं आहे. सापाच्या डोक्यावर शिंगासारखं काहीतरी दिसतं आहे. ही सापाची शिंगच असल्याचं सांगितलं जातं आहे.

बहुतेकांना हा व्हिडीओ पाहून विश्वास बसत नाही आहे. अनेकांनी हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं आहे. तर काही लोकांच्या मते, सापाने बेडकाची शिकार केली आहे. सापाच्या तोंडातील बेडकाचे हे दोन पाय दिसत आहे.

संबंधित बातम्या

माहिती नुसार वाळवंटी प्रदेशात असे शिंगवाले साप दिसतात. त्यांना वाळवंटी वाइपर स्नेक म्हटलं जातं. इंटरनेटवर सर्च केल्यावरही सापांच्या अशा प्रजाती दिसतील. ज्यात सापांनाही शिंग असल्याचं दिसून आलं आहे. हे वाचा -  जेव्हा धोकादायक सापासमोर येऊन झोपला तरुण, पुढे जे घडलं ते अंगावर काटा आणणारं पाहा Video पण व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतील साप तोच शिंगवाला साप आहे, किंवा या सापाला खरंच शिंग आहेत का? ही यामागे आणखी काही सत्य आहे, याबाबत माहिती नाही. हा व्हिडीओ खरा की खोटा याची शाश्वती न्यूज 18 लोकमत देत नाही. पण तुम्हाला याबाबत अधिक काही माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या