या रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी काढावे लागतात कपडे
नवी दिल्ली, 13 मे : जगभरात अनेक निरनिराळ्या आणि विचित्र गोष्टी आहेत ज्याचा आपण कधी विचारही केला नसेल. अनेक आश्चर्यकारक ठिकाणं, नियम, परंपरा आहेत ज्याविषयी काहींनी ऐकलंही नसेल. अशातच एका आगळ्यावेगळ्या रेस्टॉरंटविषयी आपण आज जाणून घेणार आहोत जिथे जिथे जाण्यासाठी तुमचे कपडे काढावे लागतात. एवढंच नाहीतर या रेस्टॉरंटमध्ये जाड लोकांच्या प्रवेशावरही बंदी आहे. हे रेस्टॉरंट नेमकं कुठं आहे आणि याविषयी काय खास गोष्ट आहे हे पाहुया. तुम्हीही कदाचित कधी विचारही केला नसेल की, असंही एखादं रेस्टॉरंट असेल की जिथे प्रवेश करताना कपडे काढावे लागतील. मात्र ही गोष्ट खरी असून हे क्रूर नियम असलेले हे रेस्टॉरंट जपानची राजधानी टोकियोमध्ये आहे. या ठिकाणी प्रवेश करायचे नियम खूपच धक्कादायक आहेत.
टोकियोमध्ये असलेल्या या रेस्टॉरंटचे नाव ‘द अमृत’ आहे. येथे येणाऱ्या पाहुण्यांना आधी स्वतःचं वजन करावं लागतं. त्यांचं वजन जास्त असल्याचं आढळून आल्यास त्यांना प्रवेश मिळत नाही. एवढंच नाही तर अंगावर टॅटू किंवा टॅटू असेल तर आत जाता येणार नाही. तुम्हाला रेस्टॉरंटच्या वेबसाइटवर नियमांची लिस्ट मिळून जाईल. द अमृत रेस्टॉरंटमध्ये केवळ 18 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांनाच प्रवेश करता येणार असून त्याआधी त्यांना त्यांचे कपडे जमा करावे लागतात आणि रेस्टॉरंटने दिलेले कागदी बनवलेले अंडरगारमेंट घालावे लागतात. तुम्हाला इथे वेटर आणि कर्मचारीही एकाच ड्रेसमध्ये दिसतील. यामध्ये असेही लिहिले आहे की, जर तुमचे वजन तुमच्या उंचीच्या सरासरी वजनापेक्षा 15 किलो किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे आढळले तर तुम्हाला परवानगी दिली जाणार नाही, जर तुमचे वजन जास्त दिसत असेल तर तुमचे वजनही मोजले जाऊ शकते. अजूनही काही नियम खूप कडक आहेत हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. हेही वाचा - फक्त एक चूक पडली महागात; महिलेच्या जिभेवर आले केस अन् जीभही काळी झाली वेबसाइटद्वारे सर्व पेमेंट अगोदरच करावे लागतील. येथे येणार्या ग्राहकांना कुणालाही हात लावून बोलता येणार नाही. ज्या पाहुण्यांना प्रवेश दिला जाईल त्यांना त्यांचे मोबाईल फोन आणि कॅमेरा टेबलावर बनवलेल्या बॉक्समध्ये ठेवावा लागतो. येथील भाडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एका तिकिटासाठी 80 हजार येन म्हणजेच सुमारे 50 हजार रुपये खर्च करावे लागतील. येथे पुरुषांचा डान्स शो देखील असेल, जो अनोखा असतो. तुम्हाला डान्स शोशिवाय जेवण करायचे असेल तर तुम्हाला 18,000 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, जगभरातील अनेक ठिकाणी विचित्र नियम आहेत. ज्याविषयी आपण कधी ऐकलंही नसेल. अशा जगभरातील नवनवीन, वेगळ्या, विचित्र, मजेशीर गोष्टी सोशल मीडियावर कायमच समोर येत असतात.