JOIN US
मराठी बातम्या / Viral / कुठे अंघोळ न करता झोपल्यास तुरुंगवास, तर कुठे हसण्यावरही बंदी; या देशांमध्ये आहेत अतिशय विचित्र कायदे

कुठे अंघोळ न करता झोपल्यास तुरुंगवास, तर कुठे हसण्यावरही बंदी; या देशांमध्ये आहेत अतिशय विचित्र कायदे

आज आम्ही तुम्हाला जगातल्या काही देशांमध्ये पाळल्या जाणार्‍या अशा नियमांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 11 जून : जगातला प्रत्येक देश आपल्या नागरिकांच्या आणि कारभाराच्या सोयीसाठी कायदे करतो. या कायद्यांनुसार नागरिक त्यांची सर्व कामं करतात. देशात सर्व काही सुरळीतपणे पार पडावं, यासाठी कायदे बनवले जातात; पण कधी-कधी काही देश असे विचित्र नियम (Weird Rules) आणि कायदे बनवतात, की ते ऐकल्यावर हसू आवरता येणार नाही. असं वाटतं, की हे विचित्र कायदे केले नसते तरी संबंधित देशांना काही फरक पडला नसता; पण तरीही ते केले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही विचित्र कायद्यांबद्दल सांगणार आहोत. नुकतंच गुजरातच्या क्षमा बिंदूने (Kshama Bindu) स्वतःशी लग्न करून भारतात खळबळ उडवून दिली. सोशल मीडियावर अनेक जणांनी या लग्नात प्रचंड इंटरेस्ट दाखवला. तिने लग्नाची घोषणा केल्यापासून नागरिक सोलोगॅमीसंबंधी भारतात (Sologamy Law in India) काय कायदा आहे, याचा शोध घेऊ लागले. शोधाअंती भारतात अशा लग्नाला मान्यता नसल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच हा विवाह कायद्याच्या दृष्टीने वैध नाही. एकवेळ हा कायदा समजण्यासारखा आहे; पण आज आम्ही तुम्हाला जगातल्या काही देशांमध्ये पाळल्या जाणार्‍या अशा नियमांबद्दल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथले लोक दुसऱ्या देशातून ऑर्डर करतात पिझ्झा; विमानाने होते डिलिव्हरी, कारण जाणून चक्रावून जाल - इंग्लंडमध्ये एक भाग असा आहे, की तिथे कोणी आंघोळ (Bath) न करता रात्री झोपायला गेलं तर त्याला तुरुंगवासही होऊ शकतो. हे बेकायदा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. - अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्कोमध्ये अंडरवेअरने कार साफ करण्यास मनाई आहे. असं करताना कोणी आढळल्यास दंड आकारला जातो. - स्वित्झर्लंडमध्ये रात्री 10 वाजल्यानंतर बाथरूममध्ये फ्लश चालवण्यास मनाई आहे. कोणत्याही घरातून फ्लशचा आवाज आल्यास त्यांच्याकडून दंड आकारला जातो. - इटलीतला (Italy) एक नियम वाचून तुम्हाला धक्का बसेल. परंतु तिथे खरंच हा नियम आहे. मिलान शहरात मानवी हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे. इथे कोणीही हसताना आढळल्यास दंड आकारला जातो. महिलेच्या मृत्यूनंतर 18 वर्षांनी कुटुंबाला न्याय; वैद्यकीय निष्काळजीपणाची डॉक्टर चुकवणार किंमत - ब्रुनेईमध्ये समलिंगी संबंध बेकायदा आहेत. दोषी आढळलेल्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते; पण ही शिक्षाही विचित्र आहे. ही शिक्षा फाशी देऊन नाही, तर दोषींचा जीव जाईपर्यंत दगड मारून दिली जाते. हे नियम आणि कायदे ऐकल्यानंतर तुम्हाला विचित्रही वाटेल, तसंच हसूही येईल. परंतु या देशांमध्ये खरंच असे विचित्र कायदे आहेत आणि नागरिकांना त्यांचं पालन करावं लागतं. या कायद्यांचं, नियमांचं पालन न केल्यास दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. नियम मोडल्यास कायद्यानुसार दंड भरावा लागतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या