नवी दिल्ली 04 मार्च : गुलाबजाम हा पदार्थ अतिशय चविष्ट मिठाईंपैकी एक आहे. याचं नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे. स्ट्रीट वेंडर्सही अधिक पैसे कमावण्यासाठी यासोबत नवनवीन प्रयोग करत राहातात (Weird Dishes). कधीकधी हे प्रयोग यशस्वी होतात आणि हा पदार्थ आणखीच चविष्ट लागतो. मात्र अनेकदा हे प्रयोग इतके विचित्र असतात की पाहूनच लोक भडकतात. सध्या एका दुकानदाराने गुलाबजामसोबत केलेला असाच एक प्रयोग मोठ्या प्रमाणात व्हायरल (Gulab Jamun Paratha Recipe) होत आहे. जो पाहून लोक भडकले आहेत. नवरीची एन्ट्री पाहून घालाल तोंडात बोटं; कधीही पाहिला नसेल असा Wedding Video आम्ही ज्या पदार्थाबद्दल बोलत आहोत त्याचं नाव आहे गुलाबजाम पराठा (Gulab Jamun Paratha). मिठाई म्हणून गुलाबजाम जवळपास सगळ्यांनाच आवडतो. मात्र जर गुलाबजामचा पराठा पाहिला तर गुलाबजामच्या फॅनचंही डोकं चक्रावून जाईल. सध्या अशाच गुलाबजाम पराठ्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ॉ
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका व्यक्तीने पिठापासून कणिक बनवून यात गुलाबजाम भरला आहे. यानंतर तो बेलण्याने पोळीप्रमाणे हे लाटतो आणि मग तव्यावर टाकून भाजतो. पराठ्यावर तो गुलाबजामचा पाकही टाकताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर 13 फेब्रुवारीला अपलोड केला गेला आहे.
गुलाबजाम पराठ्याची ही डिश पाहून लोक कमेंट सेक्शनमध्ये यावर निरनिराळ्या कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं, या जगातील सगळ्या चांगल्या डिश संपल्या आहेत का? दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, यापेक्षा तुम्ही एक पुरणपोळी बनवली असती तर बरं झालं असतं. आणखी एकाने लिहिलं, हा व्हिडिओ पाहून गुलाबजामप्रेमी तर नक्कीच कोमात गेले असतील. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर taste_bird नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला आतापर्यंत 38 हजारहून अधिका लाईक्स मिळाले आहेत, तर 6 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.