JOIN US
मराठी बातम्या / Viral / रातोरात फॅटचा फिट झाला! 400 किलोच्या स्टारने घटवलं 273 किलो वजन; कसा घडला हा चमत्कार?

रातोरात फॅटचा फिट झाला! 400 किलोच्या स्टारने घटवलं 273 किलो वजन; कसा घडला हा चमत्कार?

400 किलोच्या या स्टारने एका दिवसात 273 किलो वजन कमी केलं.

जाहिरात

एका दिवसात घटवलं वजन

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

वॉशिंग्टन, 02 जुलै : कित्येक लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाईझ, डाएट काय काय नाही करत. पण रातोरात वजन कमी होईल असं कधीच होत नाही. पण असा चमत्कार झाला. एका लठ्ठ व्यक्तीने रातोरात वजन कमी करून दाखवलं आहे. रातोरात त्याचं वजन 273 किलोने कमी झालं आणि तो फॅटचा फिट झाला. आता हे कसं शक्य आहे, हे पाहुयात. केसी किंग असं या व्यक्चीचं नाव. तो एक टीव्ही स्टार आहे. मूळचा यूएसच्या जॉर्जियाचा असलेला 38 वर्षांचा केसी ज्याचं वजन वजन 845 पाऊंड म्हणजेच सुमारे 400 किलो होतं. तो इतका लठ्ठ होता की त्याला बाथटबमध्ये अंघोळ करता येत नव्हती. त्याला अंघोळीसाठी घराबाहेर कुंड तयार करण्यात आला आहे. एकदा लिव्हिंग रूममध्ये तो अडकला आणि त्याला मदतीसाठी त्याच्या चुलत भावंडांना आणि मित्रांना बोलावावं लागलं. त्याला चादरीत गुंडाळून सोफ्यावर नेलं. त्यावेळी त्याची अवस्था इतकी बिकट झाली की त्याला पाच आठवडे हॉस्पिटलमध्ये काढावे लागले. जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हाच त्याचं वजन 6 किलो होतं. मोठं झाल्यावर त्याला खाण्याचं वेड लागलं लहानपणी तो स्वतःहून उठू शकत नव्हता. कुणीतरी त्याला आधार द्यायचं. नंतर त्याला खाण्याचं वेड लागलं आणि वजन अधिकच वाढलं. डॉक्टरांना दाखवलं असता त्यांनी तुम्ही ही जीवनशैली अशीच चालू ठेवली तर तुमचा लवकरच मृत्यू होईल, असं सांगितलं.त्यानंतर त्याने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. त्याने जिमला जायला सुरुवात केली. त्यामुळे काही प्रमाणात वजन कमी झालं पण जीवनशैलीबाबत त्याने पुन्हा तोच निष्काळजीपणा केला. परिणामी वजनही पुन्हा वाढलं. Viral News : वजन कमी करण्याच्या नादात तरुणीचा गेला जीव, नेमकं काय घडलं? डेली मेलच्या रिपोर्टनुसार, नुकताच तो ब्रँड न्यू मी या ट्रूली मालिकेच्या एका एपिसोडमध्ये दिसला. ज्यात तो म्हणाला, माझी जीवनशैली अशी बनली होती की जणू माझं अस्तित्वच नाही. मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत बसू शकत नव्हतो. लोक माझ्याकडे विचित्र नजरेनं बघायचे. यामुळे मला लोकांमध्ये जाता येत नव्हतं. या समस्येशी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. फॅमिली बाय द टनच्या शूटिंगदरम्यान किंगने पोट कमी करण्यासाठी व्हर्टिकल स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी केली होती आणि काही वेळातच त्याचं वजन 600 पाऊंंड म्हणजेच सुमारे 273 किलो इतकं कमी झालं. हे सर्व रातोरात घडलं. त्यानंतरही तो अतिशय कठीण परिस्थितीतून गेला, पण आता त्याने अशी शरीरयष्टी केली आहे की पाहणाऱ्यांचाही विश्वास बसणार नाही. Viral News - धक्कादायक! चिप्स खाल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू; समोर आलं असं कारण की… मी स्वतःला तंदुरुस्त आणि स्मार्ट बनवलं आहे. आता मी पूर्ण समाधानी आहे. मला पाहिजे ते खाऊ शकतो. माझ्याकडे विचित्र नजरेने कोणी पाहत नाही, असं तो म्हणाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या