JOIN US
मराठी बातम्या / Viral / मंडप सजला, पाहुणे जमले... पण भर स्टेजवर पुष्पहार पाहताच नवरदेवाला काही भलतेच सुचले, VIDEO VIRAL

मंडप सजला, पाहुणे जमले... पण भर स्टेजवर पुष्पहार पाहताच नवरदेवाला काही भलतेच सुचले, VIDEO VIRAL

लग्नाच्या दिवशी नवरदेव इतका का भडकला? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण या मागचं कारण काही वेगळंच.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 4 सप्टेंबर : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. येथे लग्नासंबंधीत देखील आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतील. ज्यांमध्ये लग्नतील काही सुंदर क्षणांचे व्हिडीओ असतात. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सध्या असाच एक लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये नवरदेवानं जे केलं ते पाहून तुम्हाला हसू तर येईलंच, परंतू तुम्हाला असा प्रश्न देखील पडेल की, या नवरदेवासोबत नक्की काय घडलं. खरंतर आपलं लग्न नेहमीच सगळ्यांच्या लक्षात राहावं असं नववधू आणि नवरदेवाची इच्छा असते. या लग्नात नवरदेवानं जे कृत्य केलं, त्यानंतर पाहूने मंडळी हे लग्न चांगलंच लक्षात ठेवतील हे मात्र नक्की या लग्नाच्या व्हिडीओमध्ये नववधू आणि नवरदेव स्टेजवर उभे आहेत आणि ते एकमेकांना हार घालण्यासाठी थांबले आहेत. तसेच त्यांच्या आजूबाजूला खूप लोक देखील जमले आहेत. या लग्नात ड्रोनचा वापर करुन हार नववधू आणि नवरदेवाकडे पोहोचणार होते. परंतू हे हार खाली येण्यापूर्वीच नवरदेवाला राग आनावर झाला आणि त्याने हे हार खाली खेचले. हे वाचा : Devar bhabhi Dance : दीराच्या लग्नात वहिनीनं धरला असा ताल, पाहून सगळेच झाले थक्क त्याच्या या कृत्यानंतर आजूबाजूचे सगळे लोक पाहातच राहिले आणि नवरदेवाला असं अचानक काय झालं? याबाबत आपापसात चर्चा करु लागले. नवऱ्याच्या या हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडीयावर भलताच व्हायरल झाला आहे. तसेच या व्हिडीओवर लोकांच्या जोरदार कमेंट आल्या आहेत.

नक्की नवऱ्याला काय झालं असावं? हे वाचा : तरुणींसोबत काका डान्स करण्यात व्यस्तं, तेव्हाच काकूंनी पाहिलं आणि मग सुरु झाला फॅमेली ड्रामा, Video Viral लग्नाच्या दिवशी नवरदेव इतका का भडकला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. खरंतर यामागचं नेमकं कारण माहित नाही. परंतू कदाचित ड्रोनमुळे वरमाळा येण्यासाठी बराच वेळ लागल्यामुळे नवरदेवाला इतका वेळ थांबणं आवडलं नसावं, ज्यामुळे त्याने रागाने हार काढले असावे, असं बोललं जात आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये लोक वेगवेगळ्या आणि मजेदार प्रतिक्रिया देताना दिसले. काहींनी वराच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली, तर काही जण वराची खिल्ली देखील उडवत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या