नवी दिल्ली 02 ऑक्टोबर : आपल्या लग्नाचा दिवस (Wedding Day) प्रत्येकासाठीच खास असतो. आपलं लग्न अगदी खास बनावं आणि या आठवणी आयुष्यभर सोबत राहाव्या यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. लोक वेगळं काहीतरी करून चर्चेत येण्याचाही प्रयत्न करतात. सध्या अशाच एका पाकिस्तानी कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video of Pakistani Couple) होत आहे. या जोडप्यानं एकदम वेगळ्या अंदाजात आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. काय म्हणावं याला! चक्क प्रेशर कुकरसोबतच केलं लग्न; 4 दिवसांतच घटस्फोट हे प्रकरण पाकिस्तानच्या हुंजा घाटीतील आहे. दोघंही एखाद्या आलिशान गाडीत किंवा पारंपारिक वाहनात नाही तर जेसीबीमध्ये बसून (Wedding Couple Riding in JCB) जात असल्याचं यात दिसतं. यासाठी जेसीबीही अगदी सुंदर पद्धतीनं सजवला गेला असून त्यावर लाईटही लावल्या गेल्या आहेत. याच्या आसपास वरातीही नाचत-गात चाललेले आहेत. नवरदेव आणि नवरी दोघंही जेसीबीच्या पुढच्या भागात उभा आहेत आणि रस्त्याच्या कडेला उभा राहून लोक त्यांना पाहात आहेत.
सोशल मीडियावर (Social Media) या व्हिडिओला नेटकऱ्यांची भलतीच पसंती मिळत आहे. याच कारणामुळे अनेक यूजर्सनी यावर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरनं लिहिलं, की काहीतरी वेगळं करण्याच्या नादात स्वतःचाच अपमान करून घेतला. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, याला म्हणतात अॅडवेंचर. याशिवाय इतरही अनेक यूजर्सनं यावर कमेंट केल्या आहेत. सरप्राईज देण्यासाठी गेलेल्या तरुणीला बसला धक्का; 3 मुलींसोबत या अवस्थेत आढळला BF हा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर पाकिस्तानी पत्रकार Ghulam Abbas Shah नं शेअर केला आहे. बातमी देईपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक मिळाले आहेत. याआधी छत्तीसगडच्या कसडोल येथील एक इंजिनिअर जेसीबी मशीनवर बसून नवरीबाईच्या घरी गेला होता.