JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'चाकू' घेऊन मुलगी मॉलमध्ये शिरली आणि पुढच्या क्षणी.... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

'चाकू' घेऊन मुलगी मॉलमध्ये शिरली आणि पुढच्या क्षणी.... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडीओमध्ये एक मुलगी शॉपिंग मॉलच्या स्वयंचलित शिडीवर चढताना दिसत आहे, तर तिच्या पॅन्टच्या मागील भागात एक मोठ्या चाकू सारखी वस्तू दिसत आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 29 जानेवारी : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. पण बऱ्याचदा आपल्याला इथे असं काही दिसतं की त्याच्यामागे वेगळंच सत्य लपलेलं असतं. याच संबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ते म्हणतात ना ‘‘दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं’’, तसंच काहीसं या व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगी एका शॉपिंग मॉलमध्ये दिसत आहे आणि तिच्या खिशात चाकू असल्याचं देखील तुम्ही पाहू शकता. तिच्या खिशात मोठा चाकू पाहून सगळेच घाबरले. ही मुलगी नक्की काय करायला आली असावी असा अनेकांना प्रश्न पडला असावा. पण तुम्ही पुढे जेव्हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुम्हाला सगळं लक्षात येईल. हे ही पाहा : मद्यधुंद महिलेनं घेतली सिंहाच्या पिंजऱ्यात उडी आणि मग… वास्तविक, हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. त्या वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की हे अपेक्षित नव्हते. आता हा व्हिडीओ कुठला आहे? तो स्क्रिप्टेड आहे का? हे कळू शकलेलं नाही. व्हिडीओमध्ये एक मुलगी शॉपिंग मॉलच्या स्वयंचलित शिडीवर चढताना दिसत आहे, तर तिच्या पॅन्टच्या मागील भागात एक मोठ्या चाकू सारखी वस्तू दिसत आहे. काही वेळाने ही महिला तो चाकू बाहेर काढते आणि थेट आपल्या कानाला लावते.

संबंधित बातम्या

आता हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हे कळलंच असेल की या मुलीकडे असलेला तो चाकू खरा चाकू नसून मोबाईलचा कव्हर आहे. या महिलेने चाकू बाहेर काढताच त्याचं सत्य समोर आले.

हा व्हिडीओ अधी पाहाताना खरोखरं धोकादायक वाटत आहे. पण तो एक प्रँक असल्यासारखं भासत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की या महिलेनं शॉपिंग मॉलमध्ये प्रवेशच कसा केला, तिला सिक्यूरिटीने थांबवलं नसावं का? आता या महिलेनं हे सगळं कसं केलं, ते तिलाच माहिती. पण हा व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असावं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या