धाडसी स्टंट आला जीवाशी
जगात अनेक साहसी लोक असतात. ज्यांना हटके आणि धाडसी गोष्टी करायला आवडतात. सोशल मीडियावर अशा धाडसी, साहसी स्टंटचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. कधी कधी हे धोक्याचे स्टंट लोकांच्या जीवावरही बेततात. नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये स्टंट करताना चिमुकला उंचावरुन खाली कोसळला. या भयानक दृश्याचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 6 वर्षाचा मुलगा स्टंट करताना उंचावरुन कोसळतो. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये नेमकं काय झालं याविषयी जाणून घेऊया.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला झिप लाईनचं अॅडव्हेंचर करत आहे. त्याच्या मागून एक व्यक्तीही दिसत आहे. तो त्याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. हा स्टंट करताना पुढच्याच क्षणी धक्कादायक दृश्य पहायला मिळतं. चिमुकल्याच्या अंगाभोवती गुंडाळलेली दोरी तुटते आणि चिमुकला 40 फूट खाली कोसळतो. हा हृदय पिळवणारा व्हिडीओ असून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. @1Around_theworl नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 24 सेकंदांचा हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा असून व्हिडीओवर अनेक कमेंट देखील येत असल्याचं पहायला मिळतंय.
दरम्यान, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण साहसी स्टंट करतात. अनेक वेगवेगळे अॅडव्हेंचर करत असतात. याचे अनेक फोटो व्हिडीओ समोर येत असतात. मात्र कधी कधी हो धाडसी स्टंट लोकांच्या अंगावर पलटतात आणि त्यांच्यासोबत गंभीर घटना घडतात. यापूर्वीही अनेक असे व्हिडीओ समोर आलेत ज्यामध्ये लोकांना स्टंट महागात पडला आहे.