प्रतिकात्मक फोटो
मुंबई 16 ऑक्टोबर : आपल्या भागात चोरी झाली किंवा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवली की आपण सगळ्यात पहिली धाव घेतो ती पोलिसात. आपल्याला हे माहिती असतं की यासगळ्यामधून पोलिसच आपल्याल न्याय मिळवून देतील. तसेच सणासुदीच्या दिवसात देखील पोलीस आपलं काम करत असता, ज्यामुळे आपण आनंदात सण साजरा करु शकतो. परंतू विचार करा की जेव्हा पोलिसच उलटं काम करत असतील आणि लोकांची फसवणूक करत असतील तर? एक असं प्रकरण समोर आलं आहे, जेथे चक्क पोलिसानेच चोरी केली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ज्यानंतर याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हे ही पाहा : जेव्हा पोलिसानेच केली चोरी… Video व्हायरल झाल्यानंतर घटनेचा खुलासा हा व्हायरल व्हिडीओ प्रयागराजच्या फुलपूर भागातील आहे. या व्हिडीओमध्ये एक पोलीस निरीक्षक मध्यरात्री एका पान दुकानातून लाइट बल्ब चोरताना दिसत आहे. ही चोरी 6 ऑक्टोबर रोजी घडली असून सीसीटीव्हीमध्ये ती कैद झाली आहे. इन्स्पेक्टर राजेश वर्मा असे या पोलिसांचे नाव आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फुलपूर कोतवालीमध्ये तैनात इन्स्पेक्टर राजेश वर्मा यांना एसएसपीने निलंबित केले आहे. व्हिडीओमध्ये, बंद पान दुकानाजवळ जाऊन इन्स्पेक्टर चतुराईने इकडे तिकडे बघताना दिसत आहेत. मग तो पटकन दुकानाबाहेरचा एलईडी बल्ब काढतो, खिशात ठेवतो आणि निघून जातो.
हे ही पाहा : हे काय! केजरीवाल यांनी चक्क उलटा धरला धनुष्यबाण? फोटो Viral होताच समोर आलं सत्य हा हवालदार दसरा मेळ्याच्या रात्री नाईट ड्युटीवर होता. दुसर्या दिवशी सकाळी दुकानदाराच्या लक्षात आले की बल्ब गायब झाला, त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर खऱ्या चोराचा शोध लागला तेव्हा सगळ्यांना धक्का बसला कारण ही चोरी पोलिसाने केली होती, खरंतर काही भामटे आणि चुकीच्या लोकांच्या कृत्यामुळे संपूर्ण डिपार्टमेंटचं नाव खराब होतं, परंतू असं असलं तरी देखील लोकांकडून मात्र त्यांच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थीत केले जात आहेत. लोक या व्हायरल व्हिडीओवर जोरदार कमेंट्स करत आहेत.