लखनऊ 19 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. जो पाहून हसू देखील येईल आणि माणूसकीच्या नात्यानं त्या व्यक्तीवर दया देखील येईल. खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला एका व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही हे स्पष्ट पाहू शकता की, एक महिला एका व्यक्तीला चपलेनं मारहाण करत आहे. या महिलेनं इतक्या वेगानं चपलानं मारलं की जवळ-जवळ 20 सेकंदात तिने 40 चपलेचा मार तर त्याला बसलाच असेल. मिळालेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील माणसाने या महिलेची छेड काढली आहे. ज्यामुळे या संतप्त महिलेनं कशाचाही विचार न करता या व्यक्तीला जोरदार चोप दिला आहे. हे वाचा : जगातील अजब-गजब परंपरा, इथे स्वत:च्या मृत्यूसाठी लोक आवडीने करतात शॉपिंग हा व्हिडीओ पाहाताना तसा मजेदार दिसत आहे. या व्हिडीओमागची पार्श्वभूमी ऐकता, या महिलेनं जे केलं, ते चांगलंच केलं असं तुम्ही म्हणाल. पण यामुळे या मार खाणाऱ्या माणसाची काय अवस्था झाली असेल, याचा जरा विचार करा.
हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील ओराई शहरातील आहे, असं सांगितलं जातं की, जेव्हा या माणसाने महिलेची छेड काढली, तेव्हा तो नशेत होता, ज्यामुळे त्याला काहीही लक्षात आलं नाही. अखरे महिलेचा चोप खाल्यानंतर या माणसाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. ज्यानंतर पोलीस त्यावर कारवाई करत आहेत. हे वाचा : स्टाफने दीड तासांत केली अशी गोष्ट की बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, नेमकं काय आहे प्रकरण? हा व्हिडीओ Shubhankar Mishra नावाच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आलं आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. कोणी या माणसाला अशीच शिक्षा मिळायला हवंय, असं लिहिलंय, तर कोणी या माणसाची बाजू घेऊन माणूसकी दाखवण्याबद्दल म्हटलं आहे.