व्हायरल व्हिडीओ
मुंबई 20 डिसेंबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांपैकी काही व्हिडीओ हे प्राणी किंवा वाईल्ड व्हिडीओशी संबंधीत असतात. तर काही व्हिडीओ आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिला नसावा. भारतीय वन सेवेतील अधिकारी सुधा रमन यांनी नुकताच असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो याआधी कोणीही पाहिला नसेल. तुम्ही गाय, म्हैस, बकरी इत्यादी प्राण्यांची मुले जन्माला आल्याचे पाहिले असेलच, पण एका गेंड्याला बाळाला जन्म देताना तुम्ही पाहिलाय? जर नसेल तर, आम्ही तुमच्यासाठी एक व्हिडीओ आणला आहे, जो अतिशय हृदयस्पर्शी आहे. हे ही पाहा : जंगल सफारी दरम्यान व्यक्तीजवळ येऊन उभा राहिला सिंह, हा Video पाहून होईल रक्ताचं पाणी हा व्हिडीओ IFS अधिकारी सुधा रमन यांनी शेअर केला आहे. वाइल्डफ्रेंड्स आफ्रिका या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पहिल्यांदा शेअर करण्यात आला होता. गेंड्याच्या बाळाच्या जन्माचा व्हिडीओ व्हायरल
गेंड्याच्या बाळाच्या जन्माचा अविश्वसनीय क्षण एका फोटोग्राफने टिपला आणि तो ऑनलाइन शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना अधिकाऱ्याने ट्विटरवर लिहिले की, गेंड्याच्या पिल्लाला जन्म देताना पाहणे दुर्मिळ आहे.
त्यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, “असे मौल्यवान क्षण पाहणे दुर्मिळ आहे. एक नवीन जीवन, मादी गेंडा 16 ते 18 महिन्यांच्या गर्भधारणेनंतर आई बनते. तिच्या अस्तित्वाला असलेल्या अनेक धोक्यांमुळे ही गंभीर संकटग्रस्त प्रजाती बनण्यास भाग पाडले आहे. लोकसंख्येचा एक भाग.”