मुंबई 11 सप्टेंबर : इंटरनेट हा व्हिडीओंचा खजाना आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण आपल्याला इंटरनेटवर आपल्या वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. या व्हिडीओमध्ये कधी एखाद्या प्राण्याची शैली लोकांना आवडते, तर कधी काही शिकारीचे व्हिडीओ थरकाप उडवतात. नुकताच असाच एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा श्वास क्षणभर थांबेल. तुम्ही अनेकदा वाघ, सिंह किंवा चित्ता यांसारख्या प्राण्यांना जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल, परंतु सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका शिकाऱ्याने अशी एक चूक केली, ज्यामुळे तो स्वत:च शिकार झाला. नक्की असं काय घडलं? व्हिडीओच्या सुरूवातीला अनेक झेब्रा कळपामध्ये पळताना दिसत आहेत. तेव्हात मागून एक सिंहीण येते, जी या कळपातील एका झेब्रावर अटॅक करण्याचा प्रयत्न करते. परंतू तिच्या हातात झेब्रा येत नाही. पण व्हिडिओमध्ये पुढे काय होते ते पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हे वाचा : Viral video : महिलेच्या कानात शिरला साप, पिवळ्या सापाचा व्हिडीओ पाहून सर्वच हैराण ही सिंहीण झेब्रावरती अटॅक करताना खाली पडते. अखेर या सिंहीणीवरुन वेगाने धावणारे झेब्रा जातात. ज्यामुळे ही सिंहीण तेथे राहाते, तिला बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडत नाही, ज्यामुळे हे झेब्रा तिच्या अंगावरुन जातात आणि ती जखमी होते.
काही सेकंदांचा व्हिडीओ पाहून असे वाटते की, कदाचित या चेंगराचेंगरीत सिंहीणीला तिचा शिकार सहज मिळेल, पण नंतर असे काही फासे वळतात की, झेब्राच्या चेंगराचेंगरीमध्ये सिंहीणीचीच शिकार होते. ही सिंहीण जिवंत आहे की नाही याची माहिती अजून मिळू शकलेली नाही. हे वाचा : कुठे खडकांवर टांगतात, तर कुठे कुटुंबीय खातात मृतदेह; ‘या’ विचित्र अंत्यसंस्कार परंपरा मन हेलावणाऱ्या हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूबवर मसाई साइटिंग्ज नावाच्या अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला लाखाच्या आसपास व्ह्यूज आले आहेत. त्याच वेळी, व्हिडीओ पाहिल्यानंतर, वापरकर्ते जोरदार प्रतिक्रीया देत आहेत.