मुंबई 4 सप्टेंबर : तुम्ही कधी तुर्कीश आईस्क्रीम खाल्लंय? बघितलं तर नक्कीच असेल. यासंबंधीत अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यामध्ये हे आईस्क्रीम विक्रेते सहजासहजी आपल्या हातात आईस्क्रिम देत नाहीत. हे लोक इतके चलाख असतात की, ते तुमच्या समोर आईस्क्रीम पकडतात. परंतू तुम्ही किती प्रयत्न केलेत तरी ते त्यांच्या हातातून घेऊ शकत नाहीत. लोकांना असे फसवण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परंतू सध्या समोर आलेला व्हिडीओ हा काही वेगळा आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा आईस्क्रीम विक्रेता या लहान मुलासोबत चलाखी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा तोच तोंडघशी पडतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला असंच वाटेल की, या मुलाने या विक्रेत्याला चांगलाच धडा शिकवला आहे. हा मुलगा ज्यापद्धतीनं आला, ते पाहूनच लक्षात येत आहे की, या मुलाला माहित होतं की, त्याच्यासोबत असा काहीसा प्रकार घडणार आहे. ज्यामुळे तो तयारीतच येतो. तसेच हा तुर्कीश आईस्क्रीम विक्रेता काहीही चलाखी करण्यापूर्वी त्याच्या हातातून आईसक्रीम घेतो. हे वाचा : 9 वर्षाच्या मुलानं लढवली अजब शक्कल, घरातून पळाला अन् मोफत केला 2700 किमीचा हवाई प्रवास हा व्हिडीओ Harsh Goenka यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, या आईस्कीम वेंडरने लोकांना इतकं त्रास दिलं आहे आणि त्याचा बदला या मुलानं घेतला आहे. (Finally after years of teasing by Turkish ice cream vendors, this kid takes revenge)
हे वाचा : DNA टेस्ट करताच तरुणीसमोर आलं धक्कादायक सत्य, ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली व्हायरल झालेल्या व्हिडीओने अनेकांचे मनोरंजन केले आहे. इतकेच नाही तर कमेंट सेक्शनमध्ये तर लोकांच्या कमेंटच्या पाऊस पडला आहे. अवघ्या 15 सेकंदांचा हा व्हिडीओ 2.5 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.