ही घटना जवळील कारमधील कॅमेरात कैद
मुंबई 25 सप्टेंबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच असे व्हिडीओ येत असतात, जे आपलं मनोरंजन करतात. परंतू येथे आपल्याला असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्याला आश्चर्यचकीत देखीव करतात, तर कधी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जे पाहून तुमच्या लक्षात येईल की, रस्त्यावरुन चालताना किंवा गाडी चालवताना तुम्ही कितीही सतर्क राहिलात, तरी कधीकधी संकट कुठूनही आणि कोणत्याही दिशेने येऊ शकतं. हा व्हायरल व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. तुम्ही हे पाहिलं किंवा अनुभवलं असेल की, पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढते आणि असंच काहीसं या व्हिडीओमध्ये ही पाहायला मिळत आहे. अगदी काही सेकंदाचा हा व्हिडीओ खूपच धोकादायक आहे. हे पाहा : गायीची आत्महत्या म्हणून VIDEO VIRAL; प्रत्यक्षात तिथं काय घडलं पाहा पावसामुळे रस्ता ओला आणि निसरडा झाल्याचे दिसते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते. अशा स्थितीत रस्त्यावर नियंत्रण न ठेवता भरधाव वेगाने कार चालवणे रस्त्यावरील उर्वरित वाहनांसाठी धोकादायक ठरले आणि तेच या व्हिडीओमध्ये घडलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लाल रंगाची गाडी आहे. खरंतर तेथे धुकं पडल्यामुळे रस्ता स्पष्ट दिसत नाहीय, ज्यामुळे ही गाडी फारच कमी वेगाने जात आहे, ज्यामुळे पुढे होणारा अपघात टाळता येईल. परंतू एवढी काळजी घेऊन देखील या कारला अपघात झाला. खरंतर या लाल कारच्या मागून एक भरधाव वेगाने गाडी येते, या गाडीला समोरील कार दिसत नाही, ज्यामुळे ती कार या लाल कारला जोरदार धडक देते. ही धडक इतकी जोरदार होते की, या कारचा चक्काचुर होतो. ही संपूर्ण घटना बाजूच्या कारमध्ये लावलेल्या कॅमेरामध्ये कैद झाली. हे पाहा : मुसळधार पावसात धबधब्याने धारण केलं रौद्ररूप; क्षणभरात वाहून गेली मोठमोठी वाहनं, थराकाप उडवणारा VIDEO तुम्ही हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला या अपघाताची भीषणता जाणवेल
हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. इतकेच नाही तर अवघ्या 26 सेकंदांच्या या व्हिडिओलाही अनेकांनी लाइक केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले.