JOIN US
मराठी बातम्या / Viral / ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली... रस्ता अपघाताचा 'हा' व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय

ती पडली, सरकली आणि अचानक गायब झाली... रस्ता अपघाताचा 'हा' व्हिडीओ ठरला चर्चेचा विषय

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अपघात होताच स्कुटीवरील तरुणी अचानक गायब होते. ज्यामुळेच हा व्हिडीओ सर्वाधीक चर्चेचा विषय ठरला आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई २१ नोव्हेंबर : आपल्या समोर बऱ्याचदा अशा काही गोष्टी घडतात, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण जातं. तर काही गोष्टी या धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून आधी तर तुम्हाला नक्की काय घडलं हे कळणारच नाही, ज्यामुळे तुम्ही दोन वेळा तरी हा व्हिडीओ नक्की पाहावा लागेल. सोशल मीडिया हे मनोरंजनाचं प्लॅटफॉर्म आहे. ते एकदा का तुम्ही उघडलात तर तुम्हाला असंख्य व्हिडीओ तेथे पाहायला मिळतील. त्यामुळे हे व्हिडीओ पाहाण्यात लोकांचा वेळ कसा निघून जातो, हे आपलं आपल्यालाच कळणार नाही. त्यात येथे अपघाताशी संबंधी देखील आपल्याला अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे लोकांना सावध देखील करतात. हे ही पाहा : Viral Video: यमराज सुट्टीवर होता वाटतं? तरुणीसोबत जे घडलं, ते पाहून तुम्ही असंच म्हणाल या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अपघात होताच स्कुटीवरील तरुणी अचानक गायब होते. ज्यामुळेच हा व्हिडीओ सर्वाधीक चर्चेचा विषय ठरला आहे. पण आता जर तुम्ही विचार करत असाल की, त्याचा संबंध भूताशी आहे, तर तसं नाही. खरंतर ही मुलगी स्कूटी चालवताना कारला अशा प्रकारे धडकते की ती थेट मोठ्या नाल्यात जाऊन पडते.

संबंधित बातम्या

या व्हायरल व्हिडीओमध्ये आधी रस्त्याच्या मधोमध ही तरुणी स्कुटीवरुन खाली पडते आणि मग ती रस्त्यावरुन सरकून थेट रस्त्याच्या कडेला जाते आणि तिथे असलेल्या नाल्यामध्ये पडते, ज्यामुळे ही तरुणी तेथून गायब झाल्यासारखीच वाटते. व्हिडीओमध्ये पुढे काही लोक या नाल्याच्या आजूबाजूला जमल्याचे दिसत आहे.

हे लोक त्या तरुणीला नाल्या बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत. ज्यानंतर ती तरुणी सुखरुप हा बाहेर देखील पडली आहे. हा व्हिडीओ परदेशातील असल्याचं लक्षात येत आहे. ज्याला सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या