फोटो सौजन्य - Canva
थिरूवनंतपुरम, 09 जानेवारी : सर्वात उंच प्राणी कोणता असं विचारलं तर साहजिकच तुम्ही जिराफ म्हणाल. याशिवाय पूर्वीच्या काळात उंचच उंच डायनासोरही होते. पण तुम्ही कधी उंच हत्ती पाहिला आहे का? सामान्यपणे हत्तीची ओळख म्हणजे त्याच्या अवाढव्य शरीरासाठी. पण अवाढव्य शरीरासह उंचही असणारा एक हत्ती सध्या चर्चेत आला आहे. भारतातील सर्वात उंच हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होतो आहे. हत्तीचे तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी जंगलात पर्यटकांच्या मागे लागणारे, कधी मगरीसारख्या खतरनाक प्राण्याशी झुंज देणार तर कधी आपल्या क्युटनेसने सर्वांचं मन जिंकणारे. पण या हत्तीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे, याचं कारण ते म्हणजे त्याची उंची. हत्तीच्या खाली उभं राहिल्यावर त्याच्या डोक्यापर्यंत नजर जाईपर्यंतच आपली मान लचकेल इतका हा हत्ती उंच आहे. हे वाचा - तुम्हालाही प्रश्न पडत असेल हस्तिदंत एवढे महाग का असतात? काय आहे कारण…. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका मंदिरातून हा हत्ती बाहेर पडतो आहे. त्याला पाहण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारावर लोकांची गर्दी जमा झाली आहे. हा हत्ती आपली सोंड वर करून सर्वांना अभिवादन करताना दिसतो. तुम्ही नीट पाहिलं तर हत्तीसमोर असलेल्या लोकांची उंची हत्तीच्या निम्म्या पायापर्यंतही पोहोचत नाही. हत्तीसमोर सर्वजण छोटे बाहुलेच वाटत आहेत. @TansuYegen ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार हा भारतातील सर्वात उंच हत्ती आहे. याचं नाव थेचिक्कोट्टुकावु रामचंद्रन आहे. प्रेमाने त्याला रमन म्हणून हाक मारली जाते. तो 58 वर्षांचा आहे. हा देशातील सर्वात खतरनाक हत्तीही मानला जातो. आतापर्यंत त्याने 15 लोकं आणि 3 हत्तींचा जीव घेतला आहे. पण तरी केरळात या हत्तीची पूजा केली जाते. हे वाचा - हत्तीला पाहून चक्क सिंहाची उडाली घाबरगुंडी; जंगलाच्या राजाची अवस्था पाहून व्हाल चकित, VIDEO माहितीनुसार त्रिशूर पूरम उत्सवात हा हत्ती वडक्कुनाथन मंदिराचा दरवाजा उघडतो. त्यावेळी या हत्तीला सजवलं जातं. कदाचित हा व्हिडीओही त्याच उत्सावाचा असावा असं मानलं जातं पण त्याबाबत स्पष्ट माहिती नाही.
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. कुणी याला सुपर टॉल प्राणी म्हटलं आहे तर कुणी बाहुबलीचा हत्तीचा म्हटलं आहे. तुम्हाला या हत्तीला पाहून काय वाटतं किंवा याच्याबाबत काही अधिक माहिती असेल तर आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.