JOIN US
मराठी बातम्या / Viral / रस्त्यावर स्केटिंग करत असताना, बाजुच्या कारचा दरवाजा उघडला आणि मग... पाहा Video

रस्त्यावर स्केटिंग करत असताना, बाजुच्या कारचा दरवाजा उघडला आणि मग... पाहा Video

या व्हिडिओमध्ये एक मुलगा शानदार स्केटिंग करताना दिसत आहे. त्याचं ते स्केटिंग पाहून त्याचं कौतुक करावंसं वाटते, पण त्यानंतर त्याच्यासोबत घडलं ते धक्कादायक आहे.

जाहिरात

व्हायरल व्हिडीओ

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 13 डिसेंबर : सोशल मीडियावर स्केटिंगचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. स्केटिंग करणारे काही स्केटर्स एवढे तरबेज असतात, की त्यांचं स्केटिंग पाहून अचंबित व्हायला होतं. काही जण तर असे काही स्टंट करतात, की ते पाहून आपल्या अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. स्केटिंग करणाऱ्या मुलाच्या समोर असलेल्या कारचा दरवाजा अचानक उघडतो व तो मुलगा जोरात खाली पडतो. तान्सु यागेन नामक एका युझरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ कधीचा व कुठला आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही; पण हा व्हिडिओ भारतातला नाही. हा व्हिडिओ भारताबाहेरचा असल्याचं हा व्हिडिओ पाहून आपल्या लगेच लक्षात येतं. हे ही पाहा : स्टाईल मारत तरुणाने दारुला आग लावली आणि ती अंगावर पडली, Reels बनवणाऱ्या तरुणाचा Video Viral या व्हिडिओमध्ये एक मुलगा शानदार स्केटिंग करताना दिसत आहे. त्याचं ते स्केटिंग पाहून त्याचं कौतुक करावंसं वाटते. तो अतिशय वेगाने स्केटिंग करत आहे. तो एका ठिकाणी वळण घेतो व आपल्या नादात स्केटिंग करत आहे. एका ठिकाणी एक कार थांबलेली आहे.

संबंधित बातम्या

तो मुलगा पाठीमागून वेगाने स्केटिंग करत येतो आणि कारच्या जवळ आल्यावर कारचा दरवाजा अचानक उघडतो आणि तो मुलगा त्या दरवाज्याला धडकून खाली पडतो. सुदैवाने त्या मुलाला जास्त मार लागत नाही. या घटनेमागे चूक कोणाची असेल याचा आपण विचार केला, तर व्हिडिओ पाहून त्याबाबत काही गोष्टी कळतात. कारचा दरवाजा मुद्दाम त्या मुलाला पाडण्यासाठी उघडला जात नाही. तो नकळत उघडला जातो. त्या मुलाची एक चूक यात म्हणता येईल. ती चूक ही, की तो सतत कारच्या जवळून स्केटिंग करत आहे. एका सुरू असलेल्या कारच्या मागे असताना तर तो त्या कारच्या मागच्या बाजूला पकडून स्केटिंग करताना दिसत आहे.

स्केटिंग करताना असे स्टंट स्केटरने टाळायला हवेत. तसंच स्केटिंग करताना सुरक्षेची काळजीही घ्यायला हवी. हेल्मेट, हात-पायांसाठी संरक्षक कवच परिधान करायला हवं. स्केटिंगमध्ये कितीही अनुभव असला तरी अपघात सांगून होत नसतो. आपणच सुरक्षेच्या बाबतीत जागृत राहणं आवश्यक असतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या