व्हायरल व्हिडीओ
मुंबई 25 ऑक्टोबर : हिंदू धर्मात गाईला पवित्र मानले जाते, तसेच तिची पूजा देखील केली जाते. गाईपासून आपल्या अनेक गोष्टी मिळतात, म्हणूनच गाईला अन्नपूर्णा देखील म्हणतात. परंतू सोशल मीडिया वर गाईसंबंधीत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला राग आनावर होईल. खरंतर येथे एक व्यक्ती गाईला सतत त्रास देत असतो. जे खूपच चुकीचं आहे. पण अखेर त्या व्यक्तीला देखील त्याने केलेल्या गोष्टींची शिक्षा मिळालीच. हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी एकमेकांना शेअर देखील केलं आहे. लोकांना हा व्हायरल व्हिडीओ पाहून हे देखिल लक्षात आलं आहे की जो जे करतो, त्याची फरतफेड त्याला नक्कीच करावी लागते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती गाईला कसा त्रास देत आहे, हा व्यक्ती गाईला आधी लात मारतो आणि मग तिच्या शेपटीला आपल्या हाताने पिळ मारतो आणि ओढतो. तसेच तो गाईला मारतो देखील. आधी गाय हे सगळं सहन करते. परंतू अखेर ती यासगळ्याचा बदला घेतेच. थोरा-मोठ्यांना असं बोलताना तुम्ही ऐकलं असेल की, तुम्ही जे करता त्याची शिक्षा तुम्हाला याच जन्मामध्ये भोगावी लागते आणि हेच या व्यक्तीसोबत खरोखर घडलं आहे. हे ही पाहा : आधी एक लाख फटाके आणि मग पेटवून दिली गाडी… प्रसिद्धीसाठी तरुणांचा वेडेपण, Video Viral या व्यक्तीने विनाकारण मुकप्राण्याला त्रास दिला आहे. ज्यामुळे अखेर त्याच्या कर्माचं फळ गाईने त्याला दिलंच. त्याच्या या वागण्याचा गाईला राग आला आणि गाईने त्याला चांगलाच धडा शिकवला. गाय उलटी फिरली आणि तिने या व्यक्तीवर शिंगाने हल्ला केला आणि त्याला खाली पाडलं, अखेर या व्यक्तीला देखील गाईने आपल्या लाथेनं तुडवलं आणि ती पुढे गेली. इथेच हा व्हिडीओ थांबला, त्यामुळे या व्यक्तीसोबत पुढे काय घडलं आणि त्याला किती दुखापत झाली, हे कळू शकलेलं नाही.
काही सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. इंटरनेटवर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. संतप्त नेटिझन्सनी याला कर्म म्हटलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओची मजा देखील घेतली आहे.
हा व्हिडीओ कुठला आहे, हे कळू शकलेलं नाही पण हा व्हिडीओ घरका कलेश नावाच्या ट्वीटर हॅन्डलवरुन शेअर करण्यात आला आहे.