फराळ खाल्यानंतर असं करा शरीराला Detox
दिवाळीत सगळ्यांच्याच घरी आवर्जून फराळ बनवला जातो आणि फराळाशिवाय दिवाळी अपूर्ण आहे.
फराळ खाताना तर आपल्याला काही वाटत नाही, पण फराळ खाऊन झाल्यावर मात्र आपल्याला अनेक त्रास जाणवायला लागतात
खरंतर मिठाई किंवा गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्याने आपण आजारी पडू शकतो
जास्त साखर खाल्ल्याने ऍसिडीटी, पोटदुखी, सांधेदुखी किंवा मधुमेह यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात
त्यामुळे तुम्हाला फराळ खाऊन कंटाळा आला असेल तर काळजी करु नका, शरीराला डिटॉक्स करा
डिटॉक्समुळे गॅस, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी यासारख्या समस्या दूर होतील. यासोबतच आपली त्वचा आणि उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत करेल
लिंबू काकडी डिटॉक्स वॉटर कसे बनवायचे?
लिंबू आणि काकडीचेही लहान तुकडे करा. आता दोन्ही एका भांड्यात ठेवा आणि त्यात पाणी तसेच बर्फाचे तुकडे मिसळा आणि ढवळा
आता ते २-३ तास रेफ्रिजरेटरमध्ये झाकून ठेवा आणि नंतर त्याला प्या
जर हे पाणी तुम्ही रात्रभर ठेवले तरी चवीला छान लागते, पण तुम्ही ते थंड करून प्यायल्याने झटपट आराम मिळतो
जर तुम्ही दररोज 1 कप डिटॉक्स पाणी प्याल तर ते तुम्हाला पुढचे चार दिवस टिकेल. ज्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात