JOIN US
मराठी बातम्या / Viral / बाईकमधून येत होता विचित्र आवाज, स्पीड मीटर पाहताच चुकला हृदयाचा ठोका, पाहा Video

बाईकमधून येत होता विचित्र आवाज, स्पीड मीटर पाहताच चुकला हृदयाचा ठोका, पाहा Video

ही व्यक्ती जेव्हा प्रवासाला जात होती, तेव्हा तिला एक आवाज ऐकू आला, त्यानंतर त्याने जे पाहिलं ते फारच विचित्र

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 19 ऑक्टोबर : सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ येतात. हे व्हिडीओ कधी आपलं मनोरंजन करतात, तर काही व्हिडीओ हे खरंच खूप आश्चर्यचकीत करणारे असतात. सध्या एक असंच प्रकरण समोर आलं आहे, जे खूपच धक्कादायक आहे. खरंतर गाडी चालवताना एका व्यक्तीला आपल्या दुचाकीच्या स्पीड मीटरमध्ये अशी गोष्ट दिसली, ते पाहून त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. हे प्रकरण मध्यप्रदेशातील आहे. येथे दुचाकीच्या स्पीड मीटरमध्ये या व्यक्तीला चक्क नाग दिसला, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दुचाकी मीटरमध्ये काचेच्या आत हा नाग बसला होता. त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या या नागाला स्पीड मीटरवरून सुरक्षितपणे काढून जंगलात सोडण्यात आले आहे. ही घटना ज्या व्यक्तीसोबत घडली, त्या व्यक्तीचे नाव आहे नजीर. नजीर जेव्हा आपल्या बाईकवरुन कामाला जात होता. तेव्हाच सापासारखं कुणीतरी फुसफुसलं असा आवाज आला. त्याने नीट निरखून पाहिल्यावर त्याची नजर स्पीड मीटरवर पडली, ज्यानंतर तो घाबरला. हे ही पाहा : सिंहीणीच्या तावडीत अडकला, पण मृत्यूला चकमा देऊन परतला… पाहा Viral Video त्याला या मीटरमध्ये नाग दिसला, ज्यानंतर त्याने आपली गाडी हळूच रस्त्याच्या बाजूला नेऊन उभी केली. त्यानंतर तेथील लोकांनी आपल्या फोनमध्ये ही सगळी घटना कैद केली आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

संबंधित बातम्या

नजीरने रात्री उशिरा आपली दुचाकी घराबाहेर उभी केली होती, त्यावेळी कदाचित नाग काचेच्या आत गेला असावा. अशी शक्यता वर्तवली जात आहे.

नजीर खान यांनी कुटुंबासह इतर लोकांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला. त्यानंतर दुचाकीच्या मीटरची काच फोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर कसातरी सापाला बाहेर काढले आणि गावापासून दूर जंगलात सोडले गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या