JOIN US
मराठी बातम्या / Viral / वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या कारच्या छतावर बसलाय कुत्रा, Video पाहून नेटकरी भडकले

वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या कारच्या छतावर बसलाय कुत्रा, Video पाहून नेटकरी भडकले

कताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ बेंगळुरूमधील आहे.

जाहिरात

कारच्या छतावर बसलाय कुत्रा

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 05 फेब्रुवारी : सोशल मीडियावर मनोरंजक व्हिडीओची कमी नाही, येथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपला दिवस मजेदार करतात. तर काही व्हिडीओ हे आश्चर्यचकीत करणारे असतात सध्या असाच एक व्हिडीओ समोर आलेला आहे. हा एका कुत्र्याशी संबंधीत आहे. या व्हिडीओत कुत्रा कारच्या टपावर बसल्याचे दिसत आहे. शासन आणि वाहतूक पोलीस दररोज रस्ता सुरक्षेबाबत लोकांना जागरुक करतात आणि आपल्या पाळीव प्राण्यांची देखील काळजी घ्या असे सांगितले जाते. मात्र लोक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. या व्हिडीओत देखील असंच काहीसं घडलं. हे ही पाहा : Wired News : व्यक्तीनं दाताने तोडलं अजगराचं डोकं, त्यानंतर जे घडलं ते… वास्तविक, नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ बेंगळुरूमधील आहे. व्हिडीओमध्ये एक कार रस्त्यावरून जात असल्याचे दिसत आहे आणि ही कार सुसाट वेगाने जात असल्याचे दिसत आहे. या कारवर असलेला हा कुत्रा मध्येच बसत आहे, तर मध्येच उभा राहात आहे. या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे. त्यामुळे हा कुत्रा पाळिव कुत्राच असावा असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या

या कारच्या बाजूने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीने हा व्हिडीओ काढला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच लोकांनी कारच्या मालकाला फटकारले. कुत्रा कधीही पडू शकला असता तसेच त्याला दुखापत झाली असती असे लोक म्हणाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कारची नंबर प्लेटही दिसत आहे. व्हिडिओ शेअर होताच लोकांनी कारच्या मालकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या