अमरनाथ, 22 डिसेंबर : सोशल मीडियावर बरेच व्हिडिओ आणि चित्रे आहेत, परंतु अशी काही छायाचित्रे आणि व्हिडिओ आहेत जे आपले मन जिंकतात. असे क्षण तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायची इच्छा होते. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लष्करी भागात अलीकडेच एका श्वानाचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो 15 कोर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल केजेएस झिलन यांनी शेअर केला आहे. या फोटोत चिनार कॉर्पस अधिकाऱ्याला श्वान सलाम करताना दिसत आहे. सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे चित्र 01 जुलै रोजी अमरनाथ यात्रेच्या पहिल्या दिवशी काढले गेले होते. याबद्दल सैन्य अधिकारी म्हणाले, ‘जेव्हा लेफ्टनंट जनरल दर्शन घेण्यासाठी पवित्र गुहेत जात होते तेव्हा कॉर्प्स कमांडर तेथे येताच या श्वानानं अधिकाऱ्यांना सलाम केला. त्यावेळी हा फोटो काढण्यात आला’. वाचा- VIDEO: नाशिकमध्ये पाईपलाईन फुटली, 50 फुटांहून उंच पाण्याचा फवारा
वाचा- या माकडासारखं तुम्हाला कोणी मिठीत घेणारच नाही! अनुपम खेर यांनी शेअर केला VIDEO भारतीय सैन्याच्या प्रथेनुसार कोणी तुम्हाला अभिवादन करतो तर तुम्हालाही त्याला सलाम करावा लागतो. अशा परिस्थितीत लेफ्टनंट जनरल ढिल्लनंही या कुत्र्याला सलाम केला. वाचा- VIDEO : होकारासाठी काय पण! BMW आणि बंगल्याची किल्ली घेऊन केलं बॉयफ्रेंडला प्रपोज