पंतप्रधान मोदींनी शेअर केला गल्लीतील क्रिकेटचा व्हिडीओ.
**नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर :**भारतात क्रिकेटप्रेमींची कमतरता नाही. स्टेडिअम, मैदानच नाही तर अगदी गल्लीबोळातही क्रिकेट खेळला जातो. अशाच गल्लीतील एका क्रिकेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा हा गल्लीतील क्रिकेटचा व्हिडीओ पाहून इम्प्रेस झाले आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडियावरही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पंतप्रधानांनाही आवडलेल्या या गल्लीतील क्रिकेटमध्ये असं आहे तरी काय हे पाहण्याची आता तुम्हालाही उत्सुकता असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता काही मुलं बिल्डिंगच्या आवारात क्रिकेट खेळत आहेत. व्हिडीओतून क्रिकेट कमेंट्रीचा आवाजही ऐकू येत आहे. क्रिकेट म्हटलं की कॉमेंट्री आलीच. ही कॉमेंट्री सामान्यपणे इंग्रजी भाषेत असते. आता हिंदी भाषेतही कॉमेंट्री ऐकायला मिळते. काही चॅनेल्सवर स्थानिक भाषेतही या कॉमेंट्रीचा अनुवाद करून सांगितला जातो. पण या व्हिडीओतील कमेंट्री वेगळी आहे. हे वाचा - एकच फाईट वातावरण टाईट! 20 हजार फूट उंचावर Goal, Football सह खेळाडूही हवेत; Watch Video तुम्ही नीट ऐकलं तर ही संस्कृत भाषा आहे. क्रिकेटचा व्हिडीओ बनवणारी व्यक्तीच संस्कृत भाषेत कमेंट्री करते आहे. तिथं क्रिकेट पाहणाऱ्या लोकांशीही ती संस्कृतमध्ये संवाद साधते. त्यामुळेच हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींना भावला आहे. मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावेळी त्यांनी काशीतील क्रिकेट टुर्नामेंटचाही आवर्जून उल्लेख केला आहे. जिथं संस्कृतध्ये कमेंट्री होते. जगातील प्राचीन भाषांपैकी एक असलेली संस्कृत. संस्कृतला देववाणीही म्हटलं जातं. आपले धर्मग्रंथ, पुराणं संस्कृतमध्येच आहेत. मंत्र, श्लोक यांचंही उच्चारण संस्कृतमध्येच असतं. संस्कृतला कमीत कमी 4-5 हजार वर्षांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. आजही काही शाळांमध्ये संस्कृत शिकवलं जातं.
तेव्हा बोलण्यासाठी लोक संस्कृत भाषेचाच वापर करायचे पण आता ही भाषा दैनंदिन व्यवहारातून अचानक गायब झाली आहे. त्यामुळे संस्कृतमधील क्रिकेट कमेंट्रीचा हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलाच व्हायरल होतो आहे. हे वाचा - …जेव्हा Pm Narendra Modi यांच्या गाडीसमोर आली Ambulance; काय घडलं पाहा VIDEO अशी संस्कृत कमेंट्री ऐकायला कानांना खूप बरं वाटत असल्याचं बहुतेक युझर्सनी म्हटंल आहे. तर काहींनी यावर संस्कृतमध्येच कमेंट केली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा. तुम्हाला संस्कृत येत असेल तर संस्कृत भाषेत तुमची कमेंट केली तर उत्तमच.