JOIN US
मराठी बातम्या / Viral / VIDEO - शेजारी गेलेला मुलगा घरी परतलाच नाही; बिल्डिंगच्या लिफ्टचं CCTV फुटेज पाहून सर्व हादरले

VIDEO - शेजारी गेलेला मुलगा घरी परतलाच नाही; बिल्डिंगच्या लिफ्टचं CCTV फुटेज पाहून सर्व हादरले

मित्राच्या घरून निघालेला मुलगा बराच वेळ घरी आला नाही म्हणून त्याचा शोध सुरू झाला. त्यानंतर धक्कादायक सत्य समोर आलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 06 ऑक्टोबर :  11 वर्षांचा मुलगा, त्याच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. मित्राच्या घरून तो निघाला. पण तो घरी परतलाच नाही. संपूर्ण सोसायटीत त्याला शोधलं पण तो कुठेच सापडला नाही. शेवटी दोन मजल्याच्या मध्ये अडकलेल्या लिफ्टकडे सर्वांचं लक्ष गेलं. त्यानंतर बिल्डिंगचं सीसीटीव्ही फुटेच पाहिलं असता, व्हिडीओत जे दिसलं ते पाहून सर्वजण हादरले. उत्तर प्रदेशच्या नोएडामधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल  होतो आहे. ग्रेनो वेस्टमधील पॅरामाऊंट सोसायटीत हा मुलगा सहाव्या मजल्यावर राहतो. मंगळवारी रात्री तो याच इमारतीत सोळाव्या मजल्यावर राहणाऱ्या आपल्या मित्राच्या घरी गेला होता. थोड्या वेळाने त्याच्या वडिलांनी त्या मित्राकडे फोन केला तेव्हा तो तिथून निघाला असल्याचं समजलं. पण बराच वेळ मुलगा घरी आला नाही. त्यामुळे मग त्याचा शोध सुरू झाला. पूर्ण सोसायटीत तो कुठेच सापडला नाही. हे वाचा -  तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी चालत्या बाईकवर उभा राहिला; तरुणासोबत भयंकर घडलं…; पाहा VIDEO त्यानंतर सर्वांचं लक्ष लिफ्टकडे गेलं. ही लिफ्ट 15 आणि 16व्या मजल्याच्या मध्ये अडकली होती. तात्काळ  लिफ्ट उघडण्यात आली. तर तो मुलगा तिथंच सापडला. तब्बल 45 मिनिटं तो तिथंच अडकला होता. जेव्हा तो लिफ्टमधून खालच्या फ्लोअरवर येत होता तेव्हा अचानक लिफ्ट बंद झाली आणि मुलगा तिथंच अडकला.

त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसलं ते धक्कादायक होतं. @scrible_anjali ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात हा मुलगा आपल्या मित्रासोबत लिफ्टमध्ये खेळताना दिसला. लिफ्टची बटणं दाबत होता. कधी आत येत होता, कधी बाहेर जात होता, कधी लिफ्टच्या दरवाजाच्या मध्येच राहत होता. व्हिडीओ पाहून आपल्यालाही धडकी भरते. हा मुलगा आता या लिफ्टच्या मध्ये अडकतो की काय, त्याच्यासोबत काही विपरित घडतं की काय असंच वाटतं. कारण लिफ्टमध्ये मुलं अडकल्याची किंवा लिफ्टमध्ये मुलांचा जीव गेल्याची अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. हे वाचा -  पाण्याच्या बाटलीत दिलं अ‍ॅसिड, रेस्टॉरंटमधील बर्थ डे पार्टीतला धक्कादायक प्रकार लिफ्टमध्ये सीसीटीव्ही होता, अलार्म होता. गार्ड रूममध्येही हे सर्वकाही दिसत होतं, ऐकू येत होतं. पण गार्ड रूममध्ये बसलेला सुरक्षारक्षक ईअरफोन लावून बसला होता. त्यामुळे त्याने लिफ्टचं सीसीटीव्ही फुटेज पाहिलं नाही आणि अलार्मही ऐकला नाही.

संबंधित बातम्या

सुरक्षारक्षकाचा निष्काळजीपणा, बेजबाबदारपणा या मुलांच्या जीवावर बेतला असता. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी गोंधळ घातला. इंडिया.कॉम च्या वृत्तानुसार शेवटी त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या