नवी दिल्ली 30 ऑगस्ट : अंतराळवीर (Astronaut) बनणे ही सर्वात कठीण नोकरी आहे कारण ते हजारो मैल आकाशात प्रवास करतात आणि अज्ञात गोष्टी एक्सप्लोर करतात. अंतराळात प्रवास करण्याचा एक वेगळाच थरारक अनुभव असतो. मात्र, कधीकधी अंतराळवीरांनाही मित्रांसह पार्टी करण्याची इच्छा होते. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्येही (Video Viral on Social Media) अंतराळवीरांनी असंच काही केलं आहे. इंस्टाग्रामवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये (Instagram Video), अंतराळवीरांची एक टीम आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पिझ्झा डिनरचा (Pizza Party) आनंद घेताना दिसत आहे. VIDEO: अचानक नवरदेवाजवळ बसलेली नवरी उठून पळू लागली; केलं असं काही की सगळे थक्क या अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पिझ्झा पार्टी केली होती, जी पृथ्वीपासून 400 किमी पेक्षा जास्त अंतरावर आहे. या व्हिडिओने नेटिझन्सना आश्चर्यचकित केले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ थॉमस पेस्केटने (Thomas Pesquet) त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केला आहे. व्हिडिओसह, त्यांनी कॅप्शनही पोस्ट केलं की , ‘मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट, हे चित्र पृथ्वीवरील शनिवार -रविवारी होणाऱ्या विकेण्ड पार्टीसारखे दिसले. जसं सांगितलं जातं, की एक चांगला शेफ कधीही त्याचे रहस्य उघड करत नाही, परंतु मी एक व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून आपण पाहू आणि समजू शकाल. '
मुलीनं सोशल मीडियावर पोस्ट केले Nude Photo; आई-वडिलांना हृदयविकाराचा झटका जवळजवळ एका मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये थॉमस शून्य-गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात आपल्या मित्रांसह पिझ्झाचा आनंद घेताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर पिझ्झा बनवत आणि खाताना दिसले. या दरम्यान, पिझ्झा हवेत उडताना दिसला आणि तिथे उपस्थित अंतराळवीरांनी त्याचा आनंद घेतला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि इन्स्टाग्रामवर 7 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. तसेच, व्हिडिओला एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाले.