JOIN US
मराठी बातम्या / Viral / चालत्या गाडीतून पडला प्रवाशी, ट्रेनखाली जाणार तेवढ्यात जवानाने वाचवले प्राण; पाहा VIDEO

चालत्या गाडीतून पडला प्रवाशी, ट्रेनखाली जाणार तेवढ्यात जवानाने वाचवले प्राण; पाहा VIDEO

खाली पडताच हा प्रवासी ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये घसरत गेला, मात्र तेवढच्या स्थानकावर उभा असलेल्या RPF जवानाने प्रवाशाला मागे खेचले.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कल्याण, 31 जुलै : महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकावर एक भयंकर अपघात घडला. एका प्रवाशाच्या चुकीमुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. मात्र रेल्वे संरक्षण गार्ड्सच्या (RPF) प्रसंगवधानामुळे या रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचले. कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी ट्रेनमधून उतरण्याच्या घाईत एक प्रवासी चालत्या गाडीतून खाली पडला. खाली पडताच हा प्रवासी ट्रॅक आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये घसरत गेला, मात्र तेवढ्यात स्थानकावर उभा असलेल्या RPF जवानाने प्रवाशाला मागे खेचले. यामुळे या प्रवाशाचे प्राण वाचले. स्टेशन ड्युटीवर तैनात आरपीएफ जवान साहू आणि महाराष्ट्र सुरक्षा बल (MSF) सोमनाथ महाजन यांनी या प्रवाशाला पाहिले आणि या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी धावले. ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा जीव वाचविण्यात दोन्ही सैनिकांना यश आले. वाचा- CCTV VIDEO: हम तो उड गये! हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक

वाचा- पाण्यात दोन सापांमध्ये खतरनाक राडा, हवेतून केला वार; थरारक VIDEO VIRAL ट्विटरवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना रेल्वेने म्हटले आहे की, “कृपया चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करू नका. हे प्राणघातक ठरू शकते". वृत्तसंस्था एएनआयच्या मते, एक 52 वर्षीय व्यक्ती मंगळवारी कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होती.

वाचा- मध्यरात्री रुग्णालयातून येत होता किंचाळण्याचा आवाज, VIDEO VIRAL झाला आणि… असे अनेक अपघात रेल्वे ट्रॅकवर पाहायला मिळतात, अनेकांना या अपघातात जीवही गमवावा लागतो. मात्र यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या प्रसंगवधानामुळे या रेल्वे प्रवाशाचे प्राण वाचले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या