नवी दिल्ली 22 डिसेंबर : ब्रेकअपनंतर किंवा मन तुटल्यानंतर आपलं दुःख व्यक्त करणाऱ्या अनेक लव्हर्सचे व्हिडिओ (Viral Videos of Lovers) तुम्ही आजपर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतील. काही व्हिडिओमध्ये तर मुलं थेट तरुणीच्या लग्नात जाऊनच गोंधळ घालताना दिसतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक अतिशय वेगळा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. या व्हिडिओमध्ये एक नवरीबाई यामुळे नाराज झालेली दिसली, कारण तिचा ब्रॉयफ्रेंड तिचं लग्न थांबवण्यासाठी मंडपात आला नाही. हा व्हिडिओ (Video of Bride Crying for Ex Boyfriend) सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चोरीची विचित्र घटना; भामट्याने लंपास केली अशी वस्तू की पोलिसांसह सरकारही हैराण व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ही नवरीबाई लग्नानंतर आपल्या पतीसोबत एका स्टुडिओमध्ये पोहोचली आहे. ती आपल्याला एक गाणं गायचं असल्याचं सांगते. जेव्हा तिला विचारलं जातं की तुला गाणं कोणासाठी गायचं आहे, तेव्हा ती सांगते की माझ्या एक्स बॉयफ्रेंडसाठी. हे ऐकून स्टुडिओमधील एक तरुण तिला विचारतो की तुझ्या प्रियकराचं नाव काय आहे. यावर नवरीबाई म्हणते की मी त्याचं नाव घेऊ शकत नाही. कारण यामुळे त्याची बदनामी होईल. मी त्याच्यावर खरं प्रेम करते.
यानंतर नवरीबाई अचानक रडू लागते. इथेच असलेला तरुण तिला विचारतो की तू का रडत आहेस. यावर ती उत्तर देते, की मी माझ्या बॉयफ्रेंडवर प्रेम करते. मात्र तो दुसरीवरच प्रेम करतो. मी तर त्याला वाईट वाटावं म्हणून लग्नाचं नाटक केलं होतं. मात्र तो माझं लग्न थांबवायलाही आला नाही. मी पूर्णपणे बर्बाद झाले आहे.
नवरीबाईचा हा व्हिडिओ अपलोड होताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.