चित्रकूटच्या मराठीकालीन तलावांत दडलय पारसमणीचे रहस्य, जाणून घ्या काय आहे इतिहास
चित्रकूट, 29 मे : उत्तरप्रदेशच्या चित्रकूट येथे 8 मराठा तलाव बांधलेले आहेत. असं म्हंटल जात की या तलावांमध्ये पारसमणीचे रहस्य दडले आहे. तसेच या तलावांमध्ये सोने-चांदी लपवण्याचे रहस्य असल्याचे देखील सांगितले जाते. संध्याकाळ होताच या तलावांतील पाण्याचा रंगही बदलतो तेव्हा अशा तलावांचे संरक्षण करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे. चित्रकूट जिल्ह्याचे पर्यटन तज्ज्ञ सत्य प्रकाश द्विवेदी म्हणाले की, गणेश बागेत बांधलेल्या तलावाचे पाणी संध्याकाळी बदलते. या तलावात पारस मणीचे रहस्यही दडले आहे. हा तलाव चित्रकूटमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि हा तलाव त्या काळापासूनचा आहे जेव्हा येथे राजे राज्य करत होते. राजावर हल्ला होताच त्याने घरातील सर्व दागिने या तलावात टाकून तेथून पळ काढला. राजाकडे एक पारस मणि होता जो या तलावात असून तो अधूनमधून चमकतो. पर्यटक काय म्हणाले जाणून घ्या? कौशांबी जिल्ह्यातून आलेले अमित सिंह म्हणाले की, चित्रकूटमधील तलाव बघून असे वाटते की या तलावांमध्ये काहीतरी रहस्य दडलेले आहे, कारण सूर्याची किरण या तलावांमध्ये पडली की त्यातल्या पाण्याचा रंग बदलतो. त्यामुळे हा तलाव अगदी स्वर्गासारखा दिसतो. चित्रकूटमध्ये असे अनेक काही खास तलाव आहेत, परंतु या तलावांची काळजी घेताना कोणी दिसत नाही. या तलावांची काळजी घेतली तर कदाचित हा तलाव पर्यटनाचे केंद्र बनू शकेल.