लंडन, 20 सप्टेंबर : सोशल मीडियावर आधिन गेलेली मंडळ आपण पाहिली आहेत. अगदी काही सेकंदाच्या प्रसिद्धीसाठी ही लोकं स्वत:चा जीवही धोक्यात टाकतात. असाच प्रकार ब्रिटनमधील सरे या शहरात घडला. एक तरुणी चालत्या गाडीत खिडकीबाहेर येऊन एक व्हिडीओ शूट करत होती. सिट ब्लेटही न लावल्यामुळे हायवेवर खाली पडली. दिलासादायक बाब म्हणजे या तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. युके पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरूणी स्नॅपचॅटसाठी एक व्हिडीओ तयार करत होती. त्यासाठी ती गाडीच्या खिडकीतून बाहेर पाहत होती. त्याचवेळी गाडीच्या दरवाज्यातून ही तरूणी खाली पडली. सरे पोलिसांनी या घटनेची माहिती देत एक फोटो पोस्ट केला आहे. वाचा- ना दोरीचा आधार ना सुरक्षा कवच; स्पायडर मॅनसारखा भरभर उंच इमारतीवर चढला तरुण
वाचा- गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी भाड्याने घेतली 1.5 कोटींची गाडी, रस्त्यातच धडकली आणि… रोड पोलिसिंग युनिट (सरे) यांनी ट्विटरवर याबाबत माहिती देत, “फ्रंट सीटवर बसलेली पहिली एम 25 हायवेवर कारमधून स्नॅपचॅट व्हिडीओ तयार करत होती. त्यावेळी अचानक ती कारमधून खाली पडली. सुदैवाने या अपघातात तरुणीला गंभीर दुखापत झाली नाही”. असे सांगितले. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर 30 सेकंदाच्या व्हिडीओसाठी आपला जीव धोक्यात टाकणाऱ्या या तरुणीवर टीका केली जात आहे.
वाचा- VIDEO : यांना कोरोना आणि जीवाची भीतीच नाही, भररस्तत्यात सुरू आहे स्टंटचा थरार मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना शनिवारी (19 सप्टेंबर) रोजी पहाटे घडली. हायवेवर जास्त गाड्या नसल्यामुळे या तरुणीला दुखापत झाली नाही. मात्र या तरुणीच्या मुर्खपणावर लोकं टीका करत आहे. तसेच पोलिसांनी सोशल मीडियाच्या आहारी जाऊन, असे स्टंट करू नका असे आवाहन लोकांना केले आहे.