वॉशिंग्टन, 31 डिसेंबर : वाघ (Tiger) म्हटलं तरी आपल्याला घाम फुटतो. एखाद्या प्राणीसंग्रहालयात, जंगल सफारीवर गेल्यानंतर समोर वाघ दिसताच भीतीने तोंडातून शब्दही फुटेनासे होतात. वाघासमोर उभं राहण्याची डेअरिंगही होत नाही. एका तरुणाने मात्र चक्क वाघाच्या जबड्यातच हात दिला. पुढे जे घडलं ते थरकाप उडवणारं आहे (Tiger attack video). अमेरिकेच्या फ्लोरिडातील ही धक्कादायक घटना आहे (Florida naples zoo tiger attack video). नेपल्स झूमधील एका कर्मचाऱ्याने स्वतःला मरण्यासाठी वाघाच्या स्वाधीन केलं. वाघासमोर जाऊन उभा राहिला आणि त्याच्या तोंडात आपला हात दिला. रिव्हर रोजेनक्विस्ट असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. 26 वर्षांचा रिव्हरने रात्रीच्या वेळी झूमध्ये गेला. वाघ असलेल्या प्रतिबंधित क्षेत्रा तो गेला. वाघ समोर येताच त्याने वायर फेन्सिंगमधून आपला हात आत टाकला. वाघाने त्याचा हातात आपल्या जबड्यात धरून खेचला. वाघाने त्याचा हात इतका करकचून तोंडात धरला की त्याला तीव्र वेदना होऊ लागला. तो मोठमोठ्याने ओरडू लागला. जीव द्यायला गेलेला रिव्हर आपल्या जी मदतीची याचना करू लागला.