प्रतिकात्मक फोटो
मुंबई 30 सप्टेंबर : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे बऱ्याचदा रातोरात एखादी गोष्ट ट्रेंड होऊ लागते, तर अनेकांना लोकांना प्रसिद्धी देखील मिळते. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे, जो मोठ्याप्रमाणात ट्रेंड होऊ लागला आहे. खरंतर जेव्हा आपण भाजीवाल्याशी संवाद साधतो किंवा टॅक्सी, तसेच कॅबमध्ये बसतो, तेव्हा आपण त्यांना एकतर भय्या, नाहीतर अंकल असं हाक मारतो, परंतू याच गोष्टीवर एका चालकाने आक्षेप घेतल आहे. खरंतर एका Uber चालकाने सिटवर एक नोट चिटकवली होती, ज्यावर त्यांनी लिहिलं होतं की, ‘‘मला भैय्या किंवा अंकल म्हणू नका..’’ ज्याचा कोणीतरी फोटो काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला, ज्यानंतर हा ड्रायव्हर आणि त्याच्या विनोद बुद्धीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. हे वाचा : साधूच्या सांगण्यावरून स्वतःला 6 फूट जमिनीखाली गाडलं, पोलीसांनी येऊन पाहिलं तेव्हा… Video Viral सोहिनी एम या ट्विटर वापरकर्त्याने कारच्या सीटवरील या नोटचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ड्रायव्हरचे त्याच्या अलौकिक कल्पनेबद्दल कौतुक केले, तर काहीजण आता ड्रायव्हरला काय आणि कोणत्या नावाने बोलवायचे? याच गोंधळात पडले आहेत.
आता ड्रायव्हरला “बॉस” म्हणावे की त्याच्या नावाने हाक मारावी? असं देखील काही लोक मजेशीरपणे म्हणत आहेत. तर एका युजरनं आपला एक अनुभव शेअर करत म्हटलं आहे की, “मी प्रत्येक ड्रायव्हरला फक्त “ड्रायव्हर बॉस म्हणतो, एकदा मी असंच एका कॅब ड्रायव्हरला बॉस म्हटलं, तेव्हा त्याने सांगितलं की त्याला 20 वर्षात त्यांना कोणीही सर म्हटले नव्हते, ज्यामुळे त्याला खूप भारी वाटलं.’’ हे वाचा : रस्त्याच्या मधोमध दोन मुलींची भयंकर मारामारी, Video Viral व्हायरल ट्विटला उत्तर देताना उबरनं देखील चोख प्रत्युत्तर दिले. “तुम्हाला जर ड्रायव्हरला कॉल करायचं असेल, तर ऍप तपासा, तुम्हाला तेथे त्यांचं नाव सापडेल.”