JOIN US
मराठी बातम्या / Viral / 400 किमी दूर बसून सोबत खेळायचे ऑनलाईन गेम; एकमेकांना न बघताच प्रेमात पडले अन्..

400 किमी दूर बसून सोबत खेळायचे ऑनलाईन गेम; एकमेकांना न बघताच प्रेमात पडले अन्..

20 वर्षीय फिन्ले ब्राउन आणि 19 वर्षीय सोफिया कार्लिले एकत्र कॉल ऑफ ड्यूटी ही प्रसिद्ध व्हिडिओ गेम खेळायचे. दोघेही एकाच टीममध्ये असायचे आणि एकत्र येऊन शत्रूंचा नायनाट करायचे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 21 मार्च : प्रेम आंधळं असतं. ते धर्म, जात, समाज, वय, अंतर यांच्या पलीकडे असतं, असं म्हणतात. माणसं एकमेकांपासून बरंच लांब राहत असली तरी एकमेकांच्या प्रेमात पडली तर एकमेकांसोबत राहण्यासाठी वाट्टेल ते करतात. लोकांना प्रेम कधीही आणि कोणत्याही परिस्थिती होतं, जसं ब्रिटनमधील एका जोडप्याला झालं. यात सोबत ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळणाऱ्या एका तरुण-तरुणीचं एकमेकांवर प्रेम जडलं (Strangers Fell in Love While playing Online Game). तरुणीसमोर हिरोपंती करायला गेला अन् झाली भलतीच फजिती; हा VIDEO पाहून पोट धरून हसा द सन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 20 वर्षीय फिन्ले ब्राउन आणि 19 वर्षीय सोफिया कार्लिले एकत्र कॉल ऑफ ड्यूटी ही प्रसिद्ध व्हिडिओ गेम खेळायचे. दोघेही एकाच टीममध्ये असायचे आणि एकत्र येऊन शत्रूंचा नायनाट करायचे. कॉल ऑफ ड्यूटी ही एक ऑनलाइन वॉर गेम आहे ज्यामध्ये अज्ञात लोक एकमेकांसोबत टीम बनवून घेतात आणि खेळतात. ते कधीही एकमेकांना भेटलेले नसतात, तरीही ते एकमेकांसोबत एका टीममध्ये खेळतात. फिन्ले आणि सोफियाच्या बाबतीतही असंच होतं. फिन्ले इंग्लंडमधील लीड्स शहरात राहत असताना, सोफिया उत्तर आयर्लंडमधील लिमावडी येथे 400 किलोमीटर दूर राहत होती. एकत्र खेळत असताना दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. फिन्लेने वेबसाइटला सांगितलं की सोफिया त्याला खूप आत्मविश्वास असणारी आणि विनोदी वाटली. त्याच्यात आणि सोफियामध्ये नक्कीच काहीतरी कनेक्शन बनणार हे त्याला सुरुवातीपासूनच माहीत होतं. दारूच्या नशेत तरुणीनं केला भलताच प्रताप; शुद्ध येताच स्वतःला पाहून बसला धक्का एकत्र खेळल्यानंतर जेव्हा दोघंही प्रेमात पडले, तेव्हा ते 6 महिन्यांनंतर एकमेकांना भेटले. 1 वर्षानंतर ते गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून कोलेरेनमध्ये एकमेकांसोबत राहू लागले. फिन्लेने सांगितलं की, सोफियाशी बोलताना दोघांमधील जवळीक वाढू लागली. ऑगस्ट 2020 मध्ये, सोफियाला तिच्या वाढदिवसानिमित्त भेटण्यासाठी फिन्ले पहिल्यांदा गेला. सोफियालाही आठवतं की ती खूप घाबरलेली होती. हे जोडपं अजूनही एकत्र खेळ खेळतात आणि दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या