JOIN US
मराठी बातम्या / Viral / एक तरुणीचे दोन प्रियकर! मध्यरात्री घडला हाई-वोल्टेज ड्रामा; वाचा, काय घडलं?

एक तरुणीचे दोन प्रियकर! मध्यरात्री घडला हाई-वोल्टेज ड्रामा; वाचा, काय घडलं?

गेल्या अनेक महिन्यांपासून ही तरुणी या दोन्ही तरुणांच्या संपर्कात होती.

जाहिरात

हाई वोल्टेज ड्रामा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अजहर खान, प्रतिनिधी सिवनी, 9 जुलै : देशात प्रेमसंबंधांतून वादाच्या अनेक घटना समोर येत आहेत. यातच आता दोन प्रेमीयुगुलांनी हाई वोल्टेज ड्रामा केला. एका तरुणीच्या प्रेमात असलेले दोन तरुणांमध्ये वाद झाला. ते दोन्ही त्या मुलीवर प्रेम करतात आणि ती मुलगीही त्या दोघांवर प्रेम करते, असा दावा त्यांनी केला. मध्यप्रदेशच्या सिवनी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मध्यरात्री बराच वेळ हे दोन्ही तरुण रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालत होते. दरम्यान, याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तरुणांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना त्यांना पोलीस ठाण्यात नेले.

नेमकं काय घडलं - ही घटना सिवनीच्या डूंडा सिवनी पोलीस ठाणे अंतर्गत बरघाट नाका परिसरातील आहे. असे म्हटले जात आहे की, गेल्या अनेक महिन्यांपासून ही तरुणी या दोन्ही तरुणांच्या संपर्कात होती. तसेच दोन्ही तरुणांना असे वाटत होते की, ही तरुणी फक्त त्याच्यापैकी एकावरच प्रेम करते. मात्र, दोन प्रियकर जेव्हा एकाच वेळी तिच्या घरी तिला भेटायला गेले तेव्हा तिचे हे सत्य समोर आले. यानंतर दोन्ही तरुणांमध्ये भांडण झाले. एकमेकांनी मारहाण, शिवीगाळही केली. यानंतर तरुणीच्या आयुष्यातून निघून जावे यासाठी दोन्ही एकमेकांवर दबाव तयार करत होते. यावेळी बराच वेळ रस्त्यावर हाई वोल्टेज ड्रामा दिसून आला. दरम्यान, पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर रस्त्यावर गोंधळ घालणे, रस्ता अडवणे, शांतता भंग करणे यासाठी कलम 160 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांच्या चौकशीत दोन्ही तरुणांनी लव ट्रँगल सारखे काही आहे, असेही काहीही सांगितलेले नाही. तपासात असे काही समोर आल्यास त्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या