मुंबई 29 सप्टेंबर : सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेदार व्हिडीओ पोस्ट केले जातात. यातील काही व्हिडीओ हे खूपच मजेदार असतात. जे आपल्याला पोट धरुन हसायला लागवतात. सोशल मीडियावर आपल्याला बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ देखील पाहायला मिळतात. परंतू सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो थोडा वेगळा आहे. हा व्हिडीओ म्हाताऱ्या काका आणि काकूंच्या रोमांटिक डान्सचा आहे. ज्यामध्ये अगदी म्हातार वयात देखील काका आणि काकू आपलं एकमेकां प्रती असलेलं प्रेम दाखवायला लाज बाळगत नाहीयत. हे वाचा : चोरांनी शिव मंदिरात चोरल्या सोनं-चांदीच्या वस्तू, पण दानपेटीला हात लावताच… पाहा Video हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक म्हातारे काका काकूला डान्स करुन दाखवत आहेत. तर काकू देखील त्यांना साथ देत गाण्याचा ताल धरत आहेत. हे दोघेही एकमेकांपासून लांब उभे आहेत, मात्र तरी देखील त्यांच्यासाठी हे फारच रोमांटिक आहे. हे दोघेही डान्स करत असताना अक्षय कुमार आणि एमी जॅक्सनवर चित्रित केलेले ‘दिल करे चुच्या चुच्या च्या’ हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्हीही पाहा. हे वाचा : आलिशान हॉटेलमधून बाहेर येताना नवरा आणि गर्लफ्रेंडला बायकोनं पाहिलं आणि मग..
हा व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेलं नाहीय, परंतू म्हाताऱ्या काका-काकूंच्या या प्रेमाला लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. butterfly__mahi नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे, ज्यानंतर त्यावर लोकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तसेच लोकांनी यावर लाईकचा पाऊस पाडला आहे.