JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video : तुम्ही कधी 'टोमॅटो आईस्क्रीम' खाल्लीय का? रेसिपी पाहून लोकांचा संताप

Viral Video : तुम्ही कधी 'टोमॅटो आईस्क्रीम' खाल्लीय का? रेसिपी पाहून लोकांचा संताप

सोशल मीडियावर रोज नवनवीन प्रयोग व्हायरल होत असतात. खास करुन खाण्याविषयी. निराळे आणि हटके फूड फ्युजनचे व्हिडीओ समोर येत असतात. विक्रेते कशात काय घालून नवी डिश बनवतील याचा विचारही करु शकत नाही.

जाहिरात

तुम्ही कधी 'टोमॅटो आईस्क्रीम' खाल्लीय का?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 जून : सोशल मीडियावर रोज नवनवीन प्रयोग व्हायरल होत असतात. खास करुन खाण्याविषयी. निराळे आणि हटके फूड फ्युजनचे व्हिडीओ समोर येत असतात. विक्रेते कशात काय घालून नवी डिश बनवतील याचा विचारही करु शकत नाही. दिवसेंदिवस याची क्रेझ वाढत चालली असून मार्केटमध्ये नवीन डिश व्हायरल होत आहे. नुकताच टोमॅटो आईस्क्रीमचा व्हिडीओ समोर आलाय. जो पाहून लोक संताप व्यक्त करत आहे. कधी कधी खाद्यपदार्थाचे काही विचित्र प्रयोगही पाहायला मिळतात. आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चर्चेत असलेला हा खाद्यपदार्थ म्हणजे ‘टोमॅटो आईस्क्रीम’. तुम्ही आंबा, संत्रा, व्हॅनिला किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवरचे आइस्क्रीम खाल्ले असेल, पण टोमॅटोचे आइस्क्रीम कधी खाल्ले आहे का?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा प्रथम टोमॅटोचे छोटे तुकडे करतो आणि नंतर त्याच्याभोवती चॉकलेटचे वर्तुळ बनवतो. मग त्यात आईस्क्रीम मिक्स करून तव्यावर फ्रिज करतो. यानंतर, तो एका प्लेटमध्ये आईस्क्रीम काढतो आणि त्यावर टोमॅटो कापतो आणि ग्राहकांना देतो. हे पाहूनच विचित्र वाटत आहे तर खाणं दूरचीच गोष्ट.

संबंधित बातम्या

@foodienovavlogs नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. थोड्याच वेळात व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसून आला. एवढंच नाहीतर व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट येत असून लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, खाण्याचे असे विचित्र प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक खाद्यपदार्थांचे व्हिडीओ समोर आले आहेत ज्याच्या कॉम्बिनेशनचा आपण विचारही करु शकत नाही. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि लोक संताप व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वीच पावभाजी आईस्क्रीमचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओलाही लोकांनी भरपूर ट्रोल केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या