JOIN US
मराठी बातम्या / Viral / वीज बिलाचं टेन्शनच नाही! पैसे वाचवण्यासाठी व्यक्तीने लढवली अनोखी शक्कल, संपूर्ण घरातच...

वीज बिलाचं टेन्शनच नाही! पैसे वाचवण्यासाठी व्यक्तीने लढवली अनोखी शक्कल, संपूर्ण घरातच...

आजकाल महागाईमुळे अनेकजण चिंतेत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत, काहीतरी जुगाड करत पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

जाहिरात

पैसे वाचवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे :  आजकाल महागाईमुळे अनेकजण चिंतेत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे लोक वेगवेगळ्या गोष्टी करत, काहीतरी जुगाड करत पैसे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. वाढती महागाई पाहता लोक आपल्या गरजेच्या वस्तू घेण्यासाठीही विचार करत आहेत. जेणेकरुन पैशांची बचत होईल आणि महागाईचा तडाखा जास्त बसणार नाही. अशातच एका व्यक्तीने महागाईपासून वाचण्यासाठी एक युक्ती लढवली आहे आणि याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. महागाईच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी एका व्यक्तीने चक्क संपूर्ण घरात फक्त एकच बल्ब बसवला. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी असून हे प्रकरण सध्या चर्चेत आलंय. डेली मेल न्यूज वेबसाइटनं याविषयी वृत्त दिलं आहे.

मार्टिन बोंगिओर्नो हा सिंगल फादर आहे. तो बेटमन्स बे, साउथ कोस्ट येथे भाड्याच्या घरात राहतो. त्याचा खर्च खूप जास्त होत असल्याने त्याने वीज वाचवण्याचा एक अतिशय विचित्र मार्ग शोधला. तो माजी डिलिव्हरी ड्रायव्हर आहे. नोकरीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे, तो आता काम करू शकत नाही, यामुळे तो कामगारांच्या नुकसानभरपाईवर जगत आहे. यामुळेच त्यांना आपले जीवन अत्यंत कमी बजेटवर चालवावे लागत आहे. वीज बिल इतके वाढले आहे की ते बिलाचे एक लाख रुपये भरण्यास सक्षम नाहीत, असे लक्षात येताच त्यांनी लगेचच याविषयी एक जुगाड शोधून काढला. त्यांनी घरात एकच बल्ब लावला आहे. तोच बल्ब तो घराच्या प्रत्येक खोलीत वापरतो. जेव्हा त्याला दुसऱ्या खोलीत जावे लागते तेव्हा तो बल्ब बाहेर काढून दुसऱ्या खोलीत ठेवतो. अशा प्रकारे तो जास्त वीजबिल येऊ नये म्हणून व्यक्तीने ही अनोखी शक्कल लढवली. एवढंच नाही तर तो इतर गोष्टींमध्येही बचत करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या