JOIN US
मराठी बातम्या / Viral / 'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल

'टिप टिप बरसा पानी' वर तरुणीने लावली आग; हा VIDEO पाहून रविना टंडनलाही विसराल

‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स करणाऱ्या या तरुणीची अदा, जलवा आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रत्येकाच्या काळजाला भिडत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 जून : ‘टिप टिप बरसा पानी’ (Tip tip barasa paani) हे गाणं म्हटलं की सर्वात आधी समोर येते ती अभिनेत्री रविना टंडन (Raveena tondon). साडी नेसून, पावसात भिजत रविना गाण्यात आपल्या अदांनी सर्वांना घायाळ करते. याच गाण्याचा एक व्हिडीओ (Tip tip barasa paani dance video)  सध्या सोशल मीडियावर (Social media) होतो आहे. ज्यात एका तरुणीने या गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स पाहून तुम्ही रविना टंडनालाही विसरून जाल. अक्षय कुमार आणि रविना टंडन यांच्या  खिलाडी फिल्मधील हे गाणं. 90 च्या दशकातील गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे. हे गाणं आजही अनेकांना वेड लावतं. या गाण्यातील रविनाचा जलवा आणि तिची अदा पाहून किती तरी तरुण दिवाने होतात. पण आता याच गाण्यावर ठुमके लगावणाऱ्या या तरुणीचा डान्स पाहाल तर तुम्ही तिचेसुद्धा दिवाने व्हाल.

या गाण्यावर तुम्हाला सोशल मीडियावर तसे बरेच डान्स व्हिडीओ दिसतील. पण कनिष्का शर्मा (Kanishka Sharma) नावाच्या या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल  होतो आहे. 19 जूनला हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला. अवघ्या काही दिवसांतच लाखो जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हे वाचा -  ‘आई माझ्या बाबांशी लग्न करशील का?’, कधीच पाहिला नसेल असा प्रपोजचा CUTE VIDEO व्हिडीओत पाहू शकता कनिष्काने या गाण्यात वेगवेगळ्या स्टेप्स केल्या आहेत. तिची अदा, जलवा आणि चेहऱ्यावरील हावभाव प्रत्येकाच्या काळजाला भिडत आहेत. हा व्हिडीओ पाहताना एखादी रोमँटिक फिल्मच पाहत आहोत, असंच कित्येकांना वाटत असेल. तिच्या या कातिलाना अदांनी रविना टंडनलाही विसरायला लावलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या