JOIN US
मराठी बातम्या / Viral / Viral Video: डेंजर! झाडाखाली झोपलेल्या वाघाला कुत्र्यानं दिलं आव्हान; फक्त 8 सेकंदातच संपवला खेळ

Viral Video: डेंजर! झाडाखाली झोपलेल्या वाघाला कुत्र्यानं दिलं आव्हान; फक्त 8 सेकंदातच संपवला खेळ

Tiger Killed Dog Viral Video: जगातील सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक म्हणजे वाघ. बऱ्याच लोकांना तर कुत्र्यामांजरासारखं वाघालाही पाळावं असं वाटतं. परंतु तो वाघ आहे. जितका दिसायला चांगला तितकाच डेंजर! त्याला लांबून बघणंच ठिक, त्याच्या नादाला लागलं तर कार्यक्रम होणार हे फिक्स…वाघाच्या ताकदीपुढे मोठमोठे प्राणीही गुडघे टेकतात. पण वाघाला कुणी आव्हान दिलं तर मग अवघड होतं. असाच एक व्हिडिओ रणथंबोरमधून समोर आला आहे.

जाहिरात

Viral Video: डेंजर! झाडाखाली झोपलेल्या वाघाला कुत्र्यानं दिलं आव्हान; फक्त 8 सेकंदातच संपवला खेळ

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जुलै: जगातील सर्वात सुंदर प्राण्यांपैकी एक म्हणजे वाघ. बऱ्याच लोकांना तर कुत्र्यामांजरासारखं वाघालाही पाळावं असं वाटतं. परंतु तो वाघ आहे. जितका दिसायला चांगला तितकाच डेंजर! त्याला लांबून बघणंच ठिक, त्याच्या नादाला लागलं तर कार्यक्रम होणार हे फिक्स…वाघाच्या ताकदीपुढे मोठमोठे प्राणीही गुडघे टेकतात. पण वाघाला कुणी आव्हान दिलं तर मग अवघड होतं. असाच एक व्हिडिओ रणथंबोरमधून समोर आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ (Viral Video on Social Media) तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये एका वाघानं कुत्र्याची (Tiger killed Dog) काय अवस्था केली, हे पाहून तुमचाही थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये एक वाघ झाडाखाली निवांत आरामात झोपलेला दिसत आहे.  तेवढ्यात त्याच्या जवळून एक कुत्रा जाऊ लागतो. त्याला वाघ झोपल्याचं दिसतंही. आता वाघ झोपलाय, म्हटल्यावर कुत्रानं तरी माघारी फिरावं ना? परंतु तो माघारी न फिरता तसाच पुढे जावू लागतो, जसं काही त्याच्या जवळ झोपलेला प्राणी वाघ नसून एखादी शाकाहारी शेळी आहे. एवढेच नाही तर वाघ झोपेतून उठल्याचं पाहून पळून जाण्याऐवजी कुत्रा त्याच्यावरच भुंकतोच पण वाघ तो वाघच ना! तो कितीतरी बलवान, त्याला कुत्र्याचा बंदोबस्त करायला किती वेळ लागणार? तो कुत्र्याच्या अंगावर झडप मारतो आणि पुढच्या 10 सेकंदाच्या आत कुत्र्याचं काम तमाम…वाघ कुत्र्याला ठार मारतो. आता ऐतीच शिकार चालून आली म्हटल्यावर वाघ तरी त्याला थोडीच सोडणारे…तो कुत्र्याला तोंडात धरून घेऊन जातो. हेही वाचा-  पाण्यात जाताच कारची बनली बोट; VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का हा वाघ ‘किलिंग मशीन’ पेक्षा कमी नाही- @irsankurrapria यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, - झोपलेल्या वाघाला हलके घेऊ नका. त्याने पुढे लिहिले - हा व्हिडिओ रणथंबोरच्या T120 वाघाचा आहे, जो किलिंग मशीन म्हणूनही कुप्रसिद्ध आहे. त्याने बिबट्या, आळशी अस्वल आणि हायना यांनाही आपली शिकार बनवली आहे. ही क्लिप लखन राणा या व्यक्तीने राजस्थानच्या ‘रणथंबोर टायगर रिझर्व्ह’ (RTR) मध्ये चित्रित केली आहे. 27 सेकंदात काय घडलं… ही संपूर्ण व्हायरल क्लिप अवघ्या 27 सेकंदांची आहे. यामध्ये वाघ झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अचानक एक सडपातळ कुत्रा त्याच्या जवळ जाऊ लागतो. त्यानंतर वाघ त्याच्या आवाजाने जागा होतो. कुत्रा भुंकतो आणि वाघाच्या दिशेने धावतो. पण वाघ काही सेकंदात त्याला ठार मारतो. आणि जंगलात घेऊन जातो. हे संपूर्ण दृश्य जवळच उभ्या असलेल्या वाहनांवर बसलेल्या पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. हेही वाचा-  अरे देवा! ‘2024 सालात आणखी एक Virus थैमान घालणार’, Time Traveller चा भयावह दावा सोशल मीडियावर हजारो लाईक्स- आता ही क्लिप सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून शेअर केली जात आहे. @irsankurrapria यांनी ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. आतापर्यंत या व्हिडिओला 55 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 1300 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच शेकडो युजर्स यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. काही वापरकर्त्यांनी म्हटलं की ते पूर्णपणे नियोजित असल्याचं दिसते. पर्यटकांच्या मनोरंजनासाठी कुत्र्याचा बळी देण्यात आला. तर काहींनी कुत्रा शांतपणे आपल्या वाटेला गेला असता, तर वाचला असता, असं म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या