JOIN US
मराठी बातम्या / Viral / शिकार करायला आला आणि कॅमेरा पाहताच दिली पोझ; वाघाचा VIDEO पाहून म्हणाल So cute

शिकार करायला आला आणि कॅमेरा पाहताच दिली पोझ; वाघाचा VIDEO पाहून म्हणाल So cute

कॅमेरा पाहताच आक्रमक वाघही शांत झाला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 ऑक्टोबर : वाघ (Tiger) म्हणजे हिंस्र प्राणी (Tiger video). समोर कुणीही दिसलं की त्याचा तो फडशा पाडणारच. प्राणी असो किंवा माणूस समोर दिसताच वाघ त्याच्या दिशेने धावत त्याच्यावर झेप घेतोच आणि एकदा हा वाघाच्या तावडीत सापडणं तर सुटका नाहीत. वाघाच्या हल्ल्याचे, शिकारीचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तुम्ही असे व्हिडीओ पाहिलेले असतील. पण आम्ही तुम्हाला एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यात वाघाचं तुम्हाला वेगळंच रूप दिसेल. शिकार करण्यासाठी आलेला वाघ एकदम आक्रमक असतो. त्यामुळे वाघाला पाहून सहसा आपण बापरे! अशीच प्रतिक्रिया देतो. तशी वाघांचे बछडे आपल्याला क्युट वाटतात. वाघ मात्र आपल्याला भयंकरच वाटतो.  पण पहिल्यांदाच भल्यामोठा वाघही तुम्हाला क्युट वाटेल. कारण या वागाचं वागणंच तसं आहे. एका प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ चांगलाचा व्हायरल होतो आहे. हे वाचा -  बापरे! डुलकीने नेलं मृत्यूच्या दारात; जाग येताच मगरीच्या जबड्यात होती महिला व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती प्राणीसंग्रहालयात आहे. इथं पारदर्शी काचा बसवल्या आहेत आणि त्याच्या पलीकडे पाण्यात एक वाघ आहे. हा वाघ स्पष्टपणे दिसतो. किंबहुना त्याच्या अगदी जवळही जाता येतं. ही व्यक्तीसुद्धा काचेजवळील कठड्यावर बसते. आपल्या हातातील मोबाईल काढते आणि सेल्फी घेते. इतक्यात या व्यक्ती पाहताच वाघ दूरून पळत तिच्याजवळ येतो.

संबंधित बातम्या

वाघाला पाहताच व्यक्ती आपला मोबाईल वर करते आणि वाघासोबत सेल्फी काढायचा जाते. आक्रमकपणे हल्ला करायला आलेला वाघही कॅमेऱ्याकडे पाहताच शांत होतं. कॅमेऱ्यात स्वतःला पाहताच तोसुद्धा फोटोसाठी तयार होतो आणि चक्क पोझ देतो. तुम्ही पाहू शकता वाघाने काचेच्या पलीकडून या व्यक्तीच्या डोक्याला डोकं टेकवलं आहे. फोटो काढताच ती व्यक्ती तिथून उठते आणि वाघ तसाच शांतपणे त्या व्यक्तीकडे पाहत राहतो. त्यावेळी तो एखाद्या मांजरासारखाच दिसतो. हे वाचा -  सोशल मीडियावर व्हायरल झाली मांजराची जबरदस्त भांडणं; VIDEO पाहून नाही आवरणार हसू naturebeauty8967 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या